Lok Sabha Election 2024 : मायावतींनी राष्ट्रीय समन्वयक पदावरून आकाश आनंदला हटविले

Lok Sabha Election 2024 : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद याला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी पदावरून हटवले.

67
Lok Sabha Election 2024 : मायावतींनी राष्ट्रीय समन्वयक पदावरून आकाश आनंदला हटविले
Lok Sabha Election 2024 : मायावतींनी राष्ट्रीय समन्वयक पदावरून आकाश आनंदला हटविले

बहुजन समाज पक्षाच्या (Bahujan Samaj Party) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद (Akash Anand) याला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी पदावरून हटवले. मायावतींनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Hardik Pandya Tattoo : हार्दिक पांड्याच्या शरीरावर किती टॅटू आहेत? त्यांचा अर्थ काय?)

सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटले आहे की, ‘चळवळीच्या व्यापक हितासाठी पूर्ण परिपक्वता नसल्यामुळे त्यांना दोन्ही पदांच्या महत्त्वाच्या जबाबदार पदांवरून हटवण्यात आले आहे. 10 डिसेंबर 2023 रोजी बसपने यूपी-उत्तराखंडच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मायावतींनी (Mayawati) त्यांचा धाकटा भाऊ आनंद कुमार (Akash Anand) यांचा मुलगा आकाश आनंद याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. पक्षाचा वारसा आणि राजकारण पुढे नेण्याचा विश्वास पुतण्याने व्यक्त केला. ही बैठक दीड तास चालली. (Lok Sabha Election 2024)

आकाश यांनी २०१७ मध्ये राजकारणात केला प्रवेश

उत्तराधिकारी घोषित होण्याच्या ६ वर्षापूर्वी, म्हणजे २०१७मध्ये, आकाश आनंद (Akash Anand) सहारनपूरमध्ये एका जाहीर सभेत मायावतींसोबत दिसला होते . त्यानंतर ते सतत पक्षात कार्यरत होते. २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर सपा आणि बसपा यांची युती तुटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २०२२च्या हिमाचल विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीत आकाश आनंदचे नाव पहिल्यांदाच आले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.