Air India: एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताय? काय काळजी घ्याल? जाणून घ्या

मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत ७० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द राहतील, असं एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

127
Air India: एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताय? काय काळजी घ्याल? जाणून घ्या

विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विमानाचे तिकीट काढले असेल, तर प्रवाशांनी सावध होण्याची आवश्यकता आहे; कारण एअर इंडियाने तब्बल ७० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. कर्मचारी एकाचवेळी रजेवर गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांचा समावेश आहे. (Air India)

एअर इंडिया एक्स्प्रेसचे क्रू मेंबर्स एकाचवेळी आजारी सुट्टीवर गेले आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने एअर इंडियावर ७० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. (Air India)

(हेही वाचा – Virat Kohli Net Worth : विराट कोहलीकडे एकूण किती पैसा आहे माहीत आहे? लाईफ स्टाईल आणि कमाईचा आकडा बघून व्हाल थक्क )

प्रवाशांकडून संताप व्यक्त
अचानक विमान उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, “एअरलाइनच्या केबिन क्रूच्या एका गटाने मंगळवारी रात्री शेवटच्या क्षणी आजारपणाच्या सुट्ट्या घेतल्या. ज्यामुळे फ्लाइटला उशीर करावा लागला आणि फ्लाइट रद्द करण्यात आली”.

समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न
“या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी चर्चा करत आहोत. एअरलाइन टीम सक्रियपणे या समस्येकडे लक्ष देत आहेत आणि समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइन दिलगिरी व्यक्त करतो”.

प्रवाशांना पूर्ण परतावा
“फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना पूर्ण परतावा दिला जाईल. किंवा इतर तारखेला फ्लाइट निश्चित होईल, असंही प्रवक्त्याने सांगितलं आहे. प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी त्यांचे उड्डाण रद्द झाले आहे की नाही हे तपासावे”, असे आवाहन देखील एअर इंडियाकडून करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.