Hardik Pandya Health Update : हार्दिक पंड्या वर्ल्ड कपला मुकणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट

58
Hardik Pandya Health Update : हार्दिक पंड्या वर्ल्ड कपला मुकणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट

गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात भारताला मोठा धक्का बसला. भारताचा (Hardik Pandya Health Update) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्याचा घोटा दुखावला असून तो आपले षटक पूर्ण न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

या दुखापतीमुळे हार्दिकला (Hardik Pandya Health Update) न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात आराम देण्यात आला होता. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता सर्व क्रिकेट प्रेमींना पंड्या पुढील सामन्यांत खेळणार की नाही असा प्रश्न पडलेला असतांना त्याच्या तब्येतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती अपडेट पाहता चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिकच्या (Hardik Pandya Health Update) टाचेला ग्रेड वनची दुखापत झाली आहे. त्यामुळे वर्ल्डकपधील उर्वरीत सामने खेळणं त्याच्यासाठी कठीण झाले आहे. NCAमध्ये म्हणजेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. NCA च्या वैद्यकीय टीमने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला हार्दिकची दुखापत गंभीर नव्हती मात्र आता हार्दिकची दुखापत गंभीर झाली आहे. त्यामुळेच हार्दिक पंड्याला आता जोपर्यंत तो पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंतत्याला मैदानावर पाठवता येणार नाही . पंड्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी किमान २ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

(हेही वाचा – Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस यांची अज्ञातस्थळी शहा यांच्याशी चर्चा?)

त्यामुळे हार्दिक पंड्या (Hardik Pandya Health Update) आता इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत होणाऱ्या सामन्यांना मुकणार आहे.

अशातच हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya Health Update) कधी खेळणार याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तो संघात कधी खेळेल या बाबतचा निर्णय काळजीपूर्वी घेतला जाईल. जर तितकी गरज वाटली तर इंजेक्शन घेऊन हार्दिक मैदानात उतरू शकतो, तेही स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात, असे सूत्रांनी सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.