Paris Olympic Qualification : भारताचा पिस्तुल नेमबाज सरबज्योत ठरला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय पिस्तुल नेमबाज

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकाबरोबरच पिस्तुल नेमबाज सरबज्योतने पॅरिस ऑलिम्पिकसाठी जागा मिळवली आहे.

67
Paris Olympic Qualification : भारताचा पिस्तुल नेमबाज सरबज्योत ठरला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय पिस्तुल नेमबाज
Paris Olympic Qualification : भारताचा पिस्तुल नेमबाज सरबज्योत ठरला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय पिस्तुल नेमबाज
  • ऋजुता लुकतुके

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकाबरोबरच पिस्तुल नेमबाज सरबज्योतने पॅरिस ऑलिम्पिकसाठी जागा मिळवली आहे. दक्षिण कोरियात चँगवॉन इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सरबज्योत सिंगने पिस्तुल प्रकारात कांस्य पदक मिळवत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. २२ वर्षीय सरबज्योत नुकताच खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे आणि त्यानंतर आशियाई क्रीडास्पर्धेत सांघिक प्रकारात त्याने एक सुवर्ण आणि एक रौप्य जिंकलं होतं. (Paris Olympic Qualification)

पण, वैयक्तिक प्रकारातील पहिलं आंतरराष्ट्रीय पदक पटकावल्यामुळे सध्या तो खुश आहे. शिवाय त्याबरोबरच पॅरिसला जाण्याचा त्याचा मार्गही मोकळा झाला आहे. सरबज्योतने अंतिम फेरीत २२१.२ गुण मिळवले. चीनच्या झँग यिफानला (२४३.७) सुवर्ण तर त्याचा सहकारी ली जिनयाओला (२४२.१) रौप्य पदक मिळालं. (Paris Olympic Qualification)

सरबज्योत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारताचा आठवा नेमबाज तर पहिलाच पिस्तुल नेमबाज ठरला आहे. सरबज्योतला लहान वयातच खांद्याच्या एका अवघड दुखापतीने सतावलं. यंदा मार्च महिन्यात भोपाळ इथं राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना सरबज्योतच्या खांद्याची हाडं सततच्या घर्षणामुळे दुखावली. त्यामुळे त्याचा उजवा हात जवळ जवळ काम करत नव्हता. साध्या हालचालींनीही त्यालाल दुखायचं. (Paris Olympic Qualification)

हाताचा सतत होत असलेला वापर आणि पिस्तुलचं वजन उचलून नेमबाजांना ही दुखापत होऊ शकते आणि नेमबाजांची कारकीर्दही या दुखापतीमुळे संपू शकते. पण, सरबज्योतने मेहनतीने या दुखापतीतून स्वत:ला बाहेर काढलं आहे. त्यानंतर आशियाई क्रीडास्पर्धा ही त्याची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा. तर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत आता त्याला पहिल्यांदाच वैयक्तिक पदक मिळालं आहे. (Paris Olympic Qualification)

(हेही वाचा – MCA : क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी ! पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक मोफत देण्याचा एमसीएचा निर्णय)

त्यामुळे अर्थातच, सरबज्योत खुश आहे. ‘आशियाई स्पर्धेत माझं वैयक्तिक पदक थोडक्यात हुकलं आणि मी चौथा आलो होतो. आताही माझी दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही. तरीही मी खेळू शकलो आणि पदकही जिंकू शकलो, याचा अर्थ माझी मेहनत आणि तंदुरुस्तीसाठी केलेले प्रयत्न योग्य दिशेनं होते,’ असं सरबज्योत सामन्यानंतर बोलताना म्हणाला. (Paris Olympic Qualification)

सरबज्योतला पात्रता फेरीत ५८१ गुण मिळाले होते. हे गुण १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सामान्यच मानले जातात. पण, सरबज्योतने सगळ्यात आतल्या वर्तुळात (१० गुण मिळवून देणारं सगळ्यात आतलं वर्तुळ) सगळ्यात जास्त फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे टायब्रेकरनंतर त्याला अंतिम फेरीसाठी संधी मिळाली. आणि ती संधी अंतिम फेरीत मात्र त्याने साधली. (Paris Olympic Qualification)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.