Ind vs SA : सुर्यकुमार आणि अर्शदीप यांचं खरंच भांडण झालं का?

टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ बसने हॉटेलला परत जात असताना सुर्यकुमार यादव आणि अर्शदीप यांच्यात थोडा वाद झाल्याचं बोललं जात आहे.

232
Ind vs SA : सुर्यकुमार आणि अर्शदीप यांचं खरंच भांडण झालं का?
Ind vs SA : सुर्यकुमार आणि अर्शदीप यांचं खरंच भांडण झालं का?
  • ऋजुता लुकतुके

टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ (Indian team) बसने हॉटेलला परत जात असताना सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि अर्शदीप (Arshdeep Singh) यांच्यात थोडा वाद झाल्याचं बोललं जात आहे. तसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Ind vs SA)

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि अर्शदीप (Arshdeep Singh) यांच्यातील संघाच्या बसमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आपल्या जागेवर बसण्यापूर्वी सुर्यकुमार (Suryakumar Yadav) अर्शदीपवर (Arshdeep Singh) बोट उगारून काहीतरी बोलताना दिसतो. त्याचा चेहराही रागीट आहे. त्यामुळे सुर्यकुमार (Suryakumar Yadav) खरंच रागावला होता की, ही एक गंमत होती, असं आता बोललं जात आहे. (Ind vs SA)

सुर्यकुमारचा (Suryakumar Yadav) चेहरा चिडलेला आहे आणि त्याने डोळे वटारत बोटही उगारलेलं यात दिसतंय. (Ind vs SA)

(हेही वाचा – Unauthorized Hoarding: नाशिक शहरात दोन दिवसांत १२२ होर्डिंग्ज हटवले, पोलीस आयुक्तांकडून ‘मोक्का’ कारवाई)

सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम सुर्यकुमारच्या नावावर 

काहींनी ही फक्त एक गंमत असल्याचंही म्हटलं आहे. सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) आपल्या बॅटने ही टी-२० मालिका गाजवली. दुसऱ्या टी-२० सामन्यात सुर्याने ५४ चेंडूंत १०० धावा केल्या आणि हे त्याचं टी-२० क्रिकेटमधील विक्रमी चौथं शतक ठरलं. रोहित आणि ग्लेन मॅक्सवेलच्या बरोबरीने आता सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. दोन्ही टी-२० सामन्यांनीत कामगिरीच्या जोरावर सुर्यकुमारला सामनावीर तसंच मालिकावीर हा किताबही मिळाली. (Ind vs SA)

कप्तीनीतही सुर्यकुमार (Suryakumar Yadav) अव्वल ठरला आणि खेळाडूंना त्याने बेधडक आणि बिनधास्त क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आयसीसी क्रमवारीत सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अव्वल फलंदाज आहे. (Ind vs SA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.