अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला पंत? ऋषभची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

104

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. अपघातानंतर ऋषभ पंतची प्रकृती आता स्थिर आहे. पंतच्या चेह-यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याला कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान, आता अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ऋषभ गाडीतून कसा उतरला?

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर त्याला घटनास्थळावरुन स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेत असताना, रुग्णवाहिकेतील पोलीस अधिका-यांना त्याने पहिली प्रतिक्रिया दिली. ऋषभने एक पोलीस अधिका-याला सांगितले की, तो गाडीतून कसा बाहेर पडला हे काहीही त्याला आठवत नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सहायक पोलीस आयुक्त देहात स्वप्ना किशोर सिंह यांनी एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे. ऋषभने पोलिसांना सांगितले की,  याबाबत त्याला सध्या काहीही आठवत नाही. ऋषभ इतका ट्राॅमामध्ये होता की त्याला काहीच आठवत नव्हते.

( हेही वाचा: Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात! टीम इंडियाचा खेळाडू गंभीर जखमी )

पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी तोडली कारची खिडकी

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताग्रस्त ऋषभ तिथून जाणा-या बसच्या चालकाने गाडीतून बाहेर काढले. अपघातानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये गाडीने पेट घेतला आणि आगीत कार जळून खाक झाली. मीडिया रिपोर्टनुसार, अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्याने कारची खिडकी तोडली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.