Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण राखणं नीरजला कठीण का वाटतं?

भालाफेकपटू नीरज चोप्राकडून पुन्हा एकदा अपेक्षा असेल ती सुवर्णाची.

103
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण राखणं नीरजला कठीण का वाटतं?
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण राखणं नीरजला कठीण का वाटतं?
  • ऋजुता लुकतुके

आशियाई खेळांनंतर आता भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला लागले आहेत. भालाफेकपटू नीरज चोप्राकडून पुन्हा एकदा अपेक्षा असेल ती सुवर्णाची. भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा मैदानात उतरला की, भारतीयांना आता त्याच्याकडून अपेक्षा असते ती सुवर्णाचीच. त्यानेही २०२३ मध्ये चाहत्यांची अपेक्षा नेहमीच पूर्ण केली आहे. विश्वविजेतेपद तसंच आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्ण जिंकलं. (Neeraj Chopra)

पण, आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कायम राखणं हे तितकं सोपं असणार नाही, असं नीरजने प्रांजळपणे बोलून दाखवलं आहे. ‘इतका काळ फॉर्म टिकून ठेवणं खरंच कठीण आहे. मी आता पीकला आहे. तो पीक आणखी काही महिने सांभाळणं तसं शारीरिकदृष्ट्याही शक्य नाही,’ असं नीरज भारतातील एका सत्कार समारंभात म्हणाला. (Neeraj Chopra)

पीटीआयशी बोलताना नीरज म्हणाला, ‘एका सुवर्णानंतर लोकांच्या अपेक्षा वाढतात आणि दरवेळी त्याला खरं उतरणं ॲथलीटसाठी सोपं नसतं. दुसरं म्हणजे दोन ऑलिम्पिक म्हणजे चार वर्षं. आणि इतकी वर्षं तुमचा सर्वोत्तम फॉर्म टिकवणंही कठीणच आहे. अर्थात, मी ऑलिम्पिक स्पर्धेची सर्वोत्तम तयारी करण्याचा प्रयत्न करणार आहे. (Neeraj Chopra)

नीरज चोप्राचा समावेश अलीकडेच लॉरेस गुडविल अँबेसिडर गटात करण्यात आला आहे. इथं समाविष्ट असलेला तो एकमेव क्रिकेट बाहेरचा खेळाडू आहे. युवराज सिंगने नीरजचं गुरुवारी स्वागत केलं. युवराज लोरेसबरोबर २०१७ पासून कार्यरत आहे. (Neeraj Chopra)

(हेही वाचा – Ind vs Pak : यावर्षीचा फॉर्म बघितला तर भारत-पाक संघांमध्ये डावं, उजवं करणंही कठीण)

नीरज पॅरिस ऑलिम्पिकचं आव्हान कठीण असल्याचं म्हणत असला तरी त्याने यंदाच्या वर्षी विश्वविजेतेपद आणि आशियाई स्पर्धा जिंकताना आपला सर्वोच्च फॉर्म दाखवून दिला आहे. यावर्षी त्याने ८८.८८ मीटरची आपली सर्वोत्तम भालाफेकही केली आहे. अर्थात, नीरजचं उद्दिष्टं आहे ते ९० मीटरच्या वर पल्ला गाठण्याचं. आणि त्यासाठी तो तयारी करत आहे. ऑलिम्पिक पदकासाठी खेळण्यापेक्षा वैयक्तिक कामगिरी सुधारण्यासाठी खेळणं त्याला जास्त महत्त्वाचं वाटतं. (Neeraj Chopra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.