Davis Cup Ind vs Pak Tie : पाकिस्तानमध्ये जाऊन डेव्हिस कप सामना खेळण्याचे टेनिस फेडरेशनचे भारताला निर्देश?

भारताला डेव्हिस कपचा पाक विरुद्धचा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानला जावं लागेल, असं आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने सुनावल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. 

65
Davis Cup Ind vs Pak Tie
Davis Cup Ind vs Pak Tie
  • ऋजुता लुकतुके

भारताला डेव्हिस कपचा पाक विरुद्धचा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानला जावं लागेल, असं आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने सुनावल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. (Davis Cup Ind vs Pak Tie)

भारताचा डेव्हिस चषक सांघिक टेनिस स्पर्धेतील पुढील सामना पाकिस्तानबरोबर पाकिस्तानमध्ये होणार आहे. पण, सुरक्षिततेच्या कारणावरून भारताने पाकिस्तानला खेळाडू पाठवायला विरोध केला होता. त्यावर आता आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या डेव्हिस चषक समितीने भारताला या सामन्यासाठी पाकिस्तानला जाण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थात, सध्या ही बातमी फक्त पाकिस्तानमध्ये चर्चिली जातेय. टेनिस फेडरेशनकडून तसं अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही. (Davis Cup Ind vs Pak Tie)

पाक टेनिस फेडरेशनच्या एका वरिष्ट अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘आंतरराष्ट्रीय संघटनेनं पाकचा यजमान पदाचा हक्क कायम ठेवला आहे आणि भारताचा सुरक्षिततेचा दावा फेटाळून लावला आहे.’ भारत आणि पाकिस्तानचा गटसाखळीत डेव्हिस चषक सामना पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरात प्रस्तावित आहे. पण, भारताने सुरक्षिततेच्या कारणावरून खेळाडू पाकमध्ये पाठवायला नकार दिला आहे. (Davis Cup Ind vs Pak Tie)

(हेही वाचा – Agriculture News : धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद; साहेब विम्याचे पैसे मिळाले….)

तसंच यासाठी आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेकडे दादही मागितली आहे. यावर पाकिस्तानने भारताच्या नकारानंतर आपली बाजू आंतरराष्ट्रीय संघटनेकडे मांडली आणि त्यानंतर हा दावा त्यांनी केला आहे. हा सामना ठरल्याप्रमाणे झाला नाही तर सामन्याचे गुण पाकिस्तानला बहाल करण्यात येतील, असा आंतरराष्ट्रीय संघटनेचा निर्णय असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. (Davis Cup Ind vs Pak Tie)

पाहुण्या संघाच्या खेळाडूंना सुरक्षा देणं हे यजमान देशाचं कर्तव्य आहे आणि इतर देशांना आतापर्यंत अशी सुरक्षा पाकिस्तानने दिली आहे, या शब्दांत भारताची त्रयस्थ ठिकाणी सामना खेळवण्याची मागणी फेटाळण्यात आल्याचाही पाकचा दावा आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघही आशिया चषकासाठी पाकिस्तानला गेला नव्हता. त्यानंतर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले. याशिवाय २०१९ मध्ये डेव्हिस चषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले असता ते कझाकिस्तानला खेळवण्यात आले होते. भारताने आपली बाजू मांडताना या उदाहरणांचा वापर केला होता. (Davis Cup Ind vs Pak Tie)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.