David Warner : कसोटी पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्तीचा डेव्हिड वॉर्नरचा निर्णय

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत आपली शेवटची कसोटी खेळणार असलेला डेव्हिड वॉर्नर एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार आहे. 

137
David Warner : कसोटी पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्तीचा डेव्हिड वॉर्नरचा निर्णय
David Warner : कसोटी पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्तीचा डेव्हिड वॉर्नरचा निर्णय
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत आपली शेवटची कसोटी खेळणार असलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner) एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार आहे. (David Warner)

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी सलामीवीर असलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner) कसोटी बरोबरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होत आहे. रविवारीच त्याने पाकिस्तान विरुद्धची मालिकेतील तिसरी कसोटी आपली शेवटीची कसोटी असेल असं म्हटलं होतं. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने एकदिवसीय क्रिकेटही थांबवत असल्याचं म्हटलंय. पण, संघाला गरज असेल तर २०२५ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळण्याची तयारी त्याने दाखवली आहे. (David Warner)

३७ वर्षीय वॉर्नरने (David Warner) ऑस्ट्रेलियासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० असे तीनही प्रकार गाजवले आहेत. बुधवारी पाकिस्तान विरुद्धची कसोटी त्याची ११२ वी कसोटी असेल. आणि ती त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. (David Warner)

(हेही वाचा – Hit And Run New Law : वाहतूकदारांच्या संपामुळे देशात इंधन तुटवडा; पेट्रोलपंपांवर वाहनचालकांची प्रचंड गर्दी)

२०२३ च्या विश्वचषक विजयांत डेव्हिड वॉर्नरचा मोलाचा वाटा

११२ कसोटी सामन्यांत वॉर्नरने (David Warner) ४५ च्या सरासरीने ८,६९५ धावा केल्या आहेत. यात २६ शतकं तर ३६ अर्धशतकं आहेत. (David Warner)

नुकताच भारतात झालेला विश्वचषक संपला तेव्हा वॉर्नरने (David Warner) आपण आणखी किमान एक वर्ष खेळू शकतो, असं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळे कसोटीतून निवृत्त होणार असला तरी तो एकदिवसीय क्रिकेट खेळेल, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण, सिडनी कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत त्याने अचानक एकदिवसीय क्रिकेटही बंद करत असल्याचं घोषित केलं. २००९ पासून वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात आहे आणि २०१५ तसंच २०२३ च्या विश्वचषक विजयांत त्याचा वाटा मोलाचा होता. (David Warner)

‘मी माझ्या कुटुंबाचंही देणं लागतो. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतलाय. मी आता कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट बंद करेन. त्यामुळे मला जगभरातील काही टी-२० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी वेळ मिळेल. माझं पुढचं नियोजन असंच असेल. अर्थात, संघाला २०२५ च्या चॅम्पियन्स करंडकासाठी माझी गरज लागली आणि तोपर्यंत मी चांगला खेळत असेन, तर मी नक्की देशासाठी उपलब्ध असेन,’ असं वॉर्नर (David Warner) पत्रकार परिषदेत म्हणाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६१ सामन्यांमध्ये वॉर्नरच्या नावावर ६,९३२ धावा जमा आहेत आणि यात शतकांचा समावेश आहे. (David Warner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.