Hit And Run New Law : वाहतूकदारांच्या संपामुळे देशात इंधन तुटवडा; पेट्रोलपंपांवर वाहनचालकांची प्रचंड गर्दी

Hit And Run New Law : देशाच्या विविध भागात ट्रकचालकांनी आपले ट्रक रस्त्यांवर उभे करून रस्ते अडवले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.

187
Hit And Run New Law : वाहतूकदारांच्या संपामुळे देशात इंधन तुटवडा; पेट्रोलपंपांवर वाहनचालकांची प्रचंड गर्दी
Hit And Run New Law : वाहतूकदारांच्या संपामुळे देशात इंधन तुटवडा; पेट्रोलपंपांवर वाहनचालकांची प्रचंड गर्दी

केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात देशभरात ट्रकचालकांनी सोमवार, १ जानेवारीपासून संप पुकारला आहे. (Hit And Run New Law) त्यामुळे अनेक ठिकाणी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संपामुळे राज्यातील पेट्रोलपंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन मिळणार नाही, या चिंतेमुळे सोमवारी रात्रीपासून पेट्रोलपंपांवर वाहनचालकांनी प्रचंड गर्दी (Motorists crowd at petrol pumps) केल्याचे दिसून आले.

(हेही वाचा – Maulana Masood Azhar Death : दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मृत्यू ? चर्चेला उधाण)

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम

केंद्र सरकारने आणलेल्या ‘हिट अँड रन’ कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डंपर चालक संपावर गेले आहेत. हा कायदा मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली-हरियाणा, पंजाब आणि उत्तरप्रदेशसह देशाच्या विविध भागात ट्रकचालकांनी आपले ट्रक रस्त्यांवर उभे करून रस्ते अडवले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावर उभी आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. (Transportation of essential commodities)

मध्यप्रदेश, राजस्थानसह 10 राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल पंप रिकामे झाले आहेत. येथे वाहनांत इंधन भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. फळे, भाजीपाला, दूध आणि कृषी मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी प्रशासन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वाहतूकदारांशी संपर्क साधत आहे.

(हेही वाचा – Manipur Violence : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये हिंसाचार कायम; तीन जणांचा मृत्यू)

… तर 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास !

नवीन कायद्यानुसार वाहनचालक (truck driver) अपघात करून फरार झाल्यास, तसेच प्राणघातक अपघाताची (Fatal accidents) माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच ७ लाख रुपये दंडदेखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र या कायद्यांतर्गत २ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती.

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान (Amritlal Madan) याविषयी म्हणाले की, ”वाहतूकदारांनी अद्याप संपाची घोषणा केलेली नाही. मंगळवार, २ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. सध्या वाहनचालकच वाहने सोडून खाली उतरत आहेत. इतरांनाही वाहन चालवू देत नाहीत.”

(हेही वाचा – Winter Skin Care : हिवाळ्याच्या दिवसांत कशी मिळवावी चमकदार आणि तजेलदार त्वचा ?)

भारतात 95 लाखांहून अधिक ट्रक दरवर्षी 100 अब्ज किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात. देशात 80 लाखांहून अधिक ट्रक चालक आहेत, जे दररोज एका शहरातून दुसऱ्या शहरात आवश्यक वस्तूंची वाहतूक करतात. (Hit And Run New Law)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.