D. Gukesh : १२व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब ते कँडिडेट्स चषक, असा आहे डी गुकेशचा प्रवास

D. Gukesh : वयाच्या सतराव्या वर्षी कँडिडेट्स चषक जिंकून गुकेशने इतिहास रचला आहे 

94
D.Gukesh : नवीन कँडिडेट्स चषक विजेत्या गुकेशचं चेन्नईत जोरदार स्वागत 
D.Gukesh : नवीन कँडिडेट्स चषक विजेत्या गुकेशचं चेन्नईत जोरदार स्वागत 
  •  ऋजुता लुकतुके

भारताचा सतरा वर्षीय बुद्धिबळपटू डी. गुकेश (D. Gukesh) या वर्षाच्या शेवटी जगज्जेत्ता डिंग लिरेनला (Ding Liren) आव्हान देईल. इतक्या कमी वयात हा मान मिळवून त्याने जागतिक स्तरावर सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात गुकेशने नाकामुराविरुद्धचा सामना काळे मोहरे घेऊन खेळताना बरोबरीत सोडवला. त्याचवेळी नेपोमिनियाची आणि करुना यांच्यातील सामनाही १०९ चालींनंतर बरोबरीतच सुटला. तिथेच गुकेशचं विजेतेपद निश्चित झालं. कारण, या तिघांपेक्षा गुकेशकडे अर्धा गुण जास्त होता. १७ व्या वर्षी कँडिडेट्स चषक (Candidates Cup) जिंकून गुकेशने ४० वर्षं जुना गॅरी कास्पारोव्हचा विक्रमही मागे टाकला.  (D. Gukesh)

(हेही वाचा- IPL 2024, Sunil Narain : सुनील नरेनने मोडला मलिंगाचा ‘हा’ जुना विक्रम )

‘खूप आनंद झालाय. दडपण दूर झाल्यासारखं वाटतंय,’ अशी प्रतिक्रिया विजयानंतर गुकेशची होती. तसा तो शांतच आहे. १२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर किताब मिळवला तेव्हाही तो बुजराच होता.  (D. Gukesh)

२००६ मध्ये चेन्नईत (Chennai) गुकेशचा जन्म झाला. त्याचे वडील नाक,कान आणि घसा तज्ज आहेत. तर आई मायक्रोबायोलॉजिस्ट. २०१८ मध्ये बारा वर्षांखालील गटात त्याने जागतिक बुद्धिबळ विजेतेपद पटकावलं तेव्हा तो सगळ्यात आधी प्रकाशझोतात आला. त्यानंतर काही महिन्यातच तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टरही झाला. ही कामगिरी करणारा तो सर्जिओ कारजाकिन नंतरच्या वयाने सगळ्यात लहान ग्रँडमास्टर होता. (D. Gukesh)

(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीला बाद दिलेला चेंडू नोबॉल का नव्हता?)

ग्रँडमास्टर झाल्यावर जागतिक स्पर्धांची कवाडं त्याच्यासाठी उघडली. या स्तरावरही मोठी मजल मारायला गुकेशने फार वेळ घेतला नाही. २०२३ पर्यंत त्याने फिडे संघटनेचा २७५० एलो गुणांचा महत्त्वाचा मापदंड पार केला होता. ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान ग्रँडमास्टर होता. त्यानंतर पुढच्याच महिन्यात त्याने जागतिक क्रमवारीत विश्वनाथन आनंदला मागे टाकलं. तो अव्वल भारतीय बुद्धिबळपटू (Indian chess player) ठरला. ३७ वर्षांनंतर आनंदला कुणीतरी या स्थानावरन मागे टाकलं होतं. (D. Gukesh)

(हेही वाचा- NIA: टेरर फंडिंगप्रकरणी श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी छापे, अधिकाऱ्यांसह सुरक्षा कर्मचारीही तैनात)

कँडिडेट्स चषकासाठी गुकेशची निवड फिडे पात्रता वर्षाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात झाली. करुना आधीच पात्र ठरला होता. त्यामुळे चौथा असूनही करुनाची जागा त्याला मिळाली. त्यानंतर मात्र गुकेश आत्मविश्वासपूर्ण खेळला. इतक्या मोठ्या स्पर्धेचं दडपण येणं स्वाभाविक होतं. पण, गुकेशनं ते सकारात्मक घेतलं. नाकामुरा, करुना या आपल्यापेक्षा वरचढ खेळाडूंना हरवलं. अखेर विजेतेपदावर नाव कोरलं. आनंद नंतर ही स्पर्धा जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. (D. Gukesh)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.