Zomato Raises Platform Fee : झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी २५ टक्क्यांनी वाढवली

Zomato Raises Platform Fee : महानगरांमध्ये प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ झाली आहे

104
Zomato Raises Platform Fee : झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी २५ टक्क्यांनी वाढवली
Zomato Raises Platform Fee : झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी २५ टक्क्यांनी वाढवली
  • ऋजुता लुकतुके

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato Raises Platform Fee) २० एप्रिलपासून प्लॅटफॉर्म फीमध्ये २५ टक्क्यांची वाढ केली आहे. आता ग्राहकांना झोमॅटोवर ऑर्डर करण्यासाठी ५ रुपये प्लॅटफॉर्म फी मोजावी लागेल. इकॉनॉमिक टाईम्स वेबसाईटने ही बातमी दिली आहे. या बातमीनुसार, नवी दिल्ली (New Delhi), मुंबई (Mumbai), लखनौ (Lucknow), बंगळुरू (Bangalore) आणि हैद्राबाद इथं प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. झोमॅटोनं या आधी जानेवारी २०२४ मध्ये प्लॅटफॉर्म फी ३ रुपयांवरून ४ रुपयांवर आणली होती. आता चार महिन्यात ती आणखी एका रुपयाने वाढवण्यात आली आहे. (Zomato Raises Platform Fee)

(हेही वाचा- NIA: टेरर फंडिंगप्रकरणी श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी छापे, अधिकाऱ्यांसह सुरक्षा कर्मचारीही तैनात)

झोमॅटो ही दिल्ली जवळ गुरुग्रामधून चालणारी कंपनी आहे. तर झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगी ही बंगळुरूमधून चालते. आणि स्विगीवर यापूर्वीच ५ रुपये प्लॅटफॉर्म फी आकारली जात होती. झोमॅटो आणि स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांकडून डिलिव्हरीचं शुल्क घेतातच. त्या व्यतिरिक्त या ऑनलाईन सेवेसाठी कंपन्यांकडून प्लॅटफॉर्म फी ही आकारण्यात येते. (Zomato Raises Platform Fee)

(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीला बाद दिलेला चेंडू नोबॉल का नव्हता?)

कंपन्यांच्या विविध सदस्य योजनांचा लाभ घेतलात तर तुम्हाला डिलिव्हरी फ्री मिळते. पण, प्लॅटफॉर्म फी ही द्यावीच लागते. प्लॅटफॉर्म फी आकारण्याची पद्धत ही ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाली आहे. आणि विशेष म्हणजे त्यानंतर कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी वाढ झाली आहे. अगदी सुरुवातीला ही फी २ रुपये प्रती ऑर्डर होती. (Zomato Raises Platform Fee)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.