NIA: टेरर फंडिंगप्रकरणी श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी छापे, अधिकाऱ्यांसह सुरक्षा कर्मचारीही तैनात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने या ठिकाणाहून गुन्हेगारी कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. ते कोणत्याही दहशतवादी गटाला निधी पुरवत होते का हे शोधण्यासाठी एजन्सी त्यांची चौकशी करत आहे.

121
NIA: टेरर फंडिंगप्रकरणी श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी छापे, अधिकाऱ्यांसह सुरक्षा कर्मचारीही तैनात

जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या दहशतवादी संघटनांचा समावेश असलेल्या चौकशीच्या कथित प्रकरणाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)सोमवारी, (२२ एप्रिल) श्रीनगरमधील ९ ठिकाणी छापे टाकले.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्ब, आयईडी आणि शस्त्रांचा वापर करणे, तेथील तरुण आणि भूमिगत कार्यकर्त्यांच्या मदतीन दहशतवादी कारवाया करणे, दहशतवादी गटांच्या सहाय्याने विविध षडयंत्रे रचणे, अशा प्रकारच्या त्यांनी केलेल्या कटकारस्थानाचा शोध घेण्यासाठी ही शोधमोहीम सुरू आहे. श्रीनगरमध्येही याकरिता कारवाई सुरू आहे. श्रीनगरमध्ये एनआयएच्या अधिकाऱ्यांसह सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकले जात आहेत.

(हेही वाचा – Eknath Shinde: महायुतीमध्ये शिवसेना किती जागांवर लढणार? अखेर मुख्यमंत्र्यांनी आकडा सांगितला)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने या ठिकाणाहून गुन्हेगारी कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. ते कोणत्याही दहशतवादी गटाला निधी पुरवत होते का हे शोधण्यासाठी एजन्सी त्यांची चौकशी करत आहे. हे छापे अलीकडील अटक आणि मागील छाप्यांचा भाग आहेत. जानेवारी महिन्यात एन. आय. ए. ने दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवणाऱ्या दोन जणांना अटक केली होती. यामध्ये हवालदार सैफुद्दीन आणि माजी सरपंचा फारुख अहमद यांचा समावेश आहे. जून २०२३ मध्ये एजन्सीने दहशतवादी निधी प्रकरणाच्या संदर्भात पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती.

दहशतवाद्यांचे आर्थिक जाळे मोडून काढण्याचा प्रयत्न
एनआयएने श्रीनगर, पुलवामा, अवंतीपोरा, अनंतनाग, शोपियान, पूंछ आणि कुपवाडा जिल्ह्यातील १५ ठिकाणी छापे टाकले. एनआयएने जम्मू आणि काश्मीरमध्ये ७०हून अधिक ठिकाणी दहशतवादी आणि त्यांच्या सहाय्यकांवर छापे टाकले आहेत. एनआयएची ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचे आर्थिक जाळे मोडून काढण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.