Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी अमेठीतून लढणार?

कॉंग्रेसने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नसली तरी राहुल गांधी यांनाच उमेदवार समजून अमेठीतील कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत.

198
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी अमेठीतून लढणार?
  • वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भविष्य धोक्यात असल्याचे भाष्य केल्यापासून कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. केरळच्या वायनाडमधील जनता राहुल गांधी यांना पराभूत करण्यासाठी मतदान करणार असल्याचे विधान पंतप्रधानांनी नुकताच केले होते. यामुळे कॉंग्रेसच्या रणनितीकारांनी अमेठीच्या बाबतीत पुनर्विचार करायला सुरवात केली आहे. (Lok Sabha Election 2024)

राहुल गांधी अमेठीतून लढणार?

कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी अमेठीमधूनही निवडणूक लढू शकतात. कॉंग्रेसचे रणनितीकार अमेठीतून लढण्यासाठी राहुल गांधी यांना राजी करण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढेच नव्हे तर, प्रियंका गांधी-वाड्रा यांनी रायबरेलीमधून निवडणुकीच्या मैदानात उतरावे असा आग्रह सुध्दा पक्षाकडून धरला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

वायनाडमधून हरणार

महत्वाचे सांगायचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधी वायनाडमधून पराभूत होणार असल्याचा दावा केला होता. ‘शहजादे को अब वायनाड से भी जाना पड रहा हैं’, असे भाष्य मोदी यांनी प्रचार सभेत केले होते. वायनाडच्या जनतेने राहुल गांधी यांना नाकारले. यामुळे कॉंग्रेसला आता त्यांच्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले होते. (Lok Sabha Election 2024)

स्मृती इराणी यांचा हल्लाबोल

पंतप्रधानांच्या या विधानामुळे कॉंग्रेस पक्ष फार गंभीर झाला आहे. एकीकडे, महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर कुटुंब सोडून पळून जाणारा नेता पहिल्यांदा बघितला असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, राहुल गांधी यांनी अमेठीतून लढावे असा आग्रह अमेठीतील जनता आणि कार्यकर्त्यांनी धरला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Igla-VSHORADS: हवाई हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या ताफ्यात नवीन क्षेपणास्रे दाखल, काय आहेत वैशिष्ट्ये?)

अमेठी-रायबरेलीत पाचव्या टप्प्यात निवडणूक

अशात, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अमेठी या गांधी कुटुंबाच्या पारंपारिक मतदारसंघातून लढण्यास सांगितले जाऊ शकते. अमेठीमध्ये पाचव्या टप्प्यात निवडणूक होणे आहे. २६ एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी होणार आहे आणि ३ मे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. २० मे ला मतदान होणे आहे. (Lok Sabha Election 2024)

एवढेच नव्हे तर, प्रियंका गांधी यांना सुध्दा रायबरेलीमधून मैदानात उतरविले जाऊ शकते. कॉंग्रेस यासाठी आग्रही आहे. पण प्रियंका यांची लढण्याची अजिबात इच्छा नाही, अशी चर्चा आहे. परंतु, पक्षाकडून सारखा दबाव टाकला जात असल्यामुळे त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. (Lok Sabha Election 2024)

कॉंग्रेस उमेदवारांची यादी प्रलंबित

अमेठी आणि रायबरेलीतून कॉंग्रेसचे उमेदवार कोण असतील? याचा खुलासा अद्याप केलेला नाही. येत्या शुक्रवारी पाचव्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी होणे आहे. अशात, कॉंग्रेसला लवकरात लवकर या मतदारसंघातून आपले उमेदवार जाहीर करावे लागणार आहे. (Lok Sabha Election 2024)

राहुल गांधी २७ ला अमेठीत

राहुल गांधी (Rahul Gandhi) २७ एप्रिलला अमेठीत येऊ शकतात. येथे ते प्रचार रॅलीला संबोधित करणार आहेत. या सभेनंतर ते अमेठीतून आपला उमेदवार अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे. कॉंग्रेसने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नसली तरी राहुल गांधी यांनाच उमेदवार समजून अमेठीतील कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.