जागतिक बुद्धिबळ खेळात चीनी खेळाडूचा पराभव; मराठमोळी कन्या Divya Deshmukh हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक!

102
लंडनमध्ये झालेल्या जागतिक ब्लिट्झ टीम बुद्धिबळ स्पर्धेत (World Blitz Team Chess Championship) भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने (Divya Deshmukh) चीनची अनुभवी खेळाडू हौ यिफानचा (Hou Yifan) दारुण पराभव केला आहे. यिफान ही जगातील नंबर वन खेळाडू आहे. तिने उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दिव्याला पराभूत केले होते. पण १९ वर्षीय दिव्याने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन केले. बुद्धिबळ खेळात (Chess game) दिव्याने सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला. ब्लिट्झ बुद्धिबळात तिने वेळेचा योग्य वापर केला. यामुळे ती गेम जिंकण्यात यशस्वी झाली. दिव्याच्या विजयाची खूप चर्चा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर विदर्भातील नागपूरच्या कन्येचं कौतुक केलं आहे. (Divya Deshmukh)

(हेही वाचा – Iran-Israel War : इराणमधील अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्याचा इस्त्रायली सैन्याचा दावा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केली कौतुक
या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिव्याचे अभिनंदन केले आणि तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर लिहिले आहे की, ‘लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या ब्लिट्झ सेमीफायनलच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमांक एकचा हौ यिफानला हरवल्याबद्दल दिव्या देशमुखचे अभिनंदन केलं. तिचे यश तिचे धाडस आणि दृढनिश्चय दर्शवते. हे अनेक येणाऱ्या बुद्धिबळपटूंना देखील प्रेरणा देत आहे. तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.’ दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींकडून कौतुक होणं प्रेरणादायी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पोस्टवर दिव्या देशमुख हिनेही प्रतिउत्तर दिलं आहे. याशिवाय संवाद साधताना तिने पंतप्रधानांचे शब्द हे प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली आहे की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक होणं ही सन्मानाची बाब आहे. पंतप्रधानांनी माझ्याबद्दल जे लिहिलं ते प्रेरणादायी आहे. वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. मी देशासाठी आणखी काही पदके मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल.

(हेही वाचा – भारत-रशिया संबंध दृढ होण्यासाठी राजकीय कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक आदानप्रदान आवश्यक; Devendra Pai यांचे विधान)

कोण आहे दिव्या देशमुख?
दिव्या देशमुख हे नाव सध्या बुद्धिबळ क्रीडा क्षेत्रात जगभरात गाजत आहे. ९ डिसेंबर २००५ मध्ये नागपूरमध्ये जन्मलेली दिव्या वयाच्या पाचव्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळते. तिची आई नम्रता आणि वडील जितेंद्र हे दोघेही डॉक्टर आहेत. दिव्यानं २०१२ मध्ये ७ वर्षांखालील वयोगटातील राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा (National Championship Tournament) जिंकली होती. त्यानंतर अंडर-१० (डरबन,२०१४) आणि अंडर-१२ (ब्राझील, २०१७) तिने जागतिक स्तरावरील स्पर्धेत छाप सोडली. दिव्यानं महिला FIDE मास्टर झाल्यावर ऑक्टोबर २०२१ मध्ये महिला ग्रँडमास्टर (WGM) चा किताबही पटकवला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.