Digital Literacy: मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या शाळांना स्नेह आशा फाउंडेशनचा हात

214
मुंबई स्थित स्नेह आशा फाउंडेशनतर्फे (Sneh Asha Foundation) डिजिटल साक्षरतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत मुंबई महानगरपालिका (BMC) आणि ठाणे महापालिका (TMC) क्षेत्रातील विविध शाळांमध्ये १० अद्ययावत संगणक प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच या प्रसंगी संस्थेतर्फे शिष्यवृत्ती योजनेच्या तिसऱ्या बॅचमध्ये निवड झालेल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (Digital Literacy)

(हेही वाचा – BMC : भटक्या कुत्र्यांना आणि मांजरींना खायला घालणाऱ्यांना रोखाल तर दाखल होईल गुन्हा; का ते वाचा)
Untitled design 12

वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Minister Ashish Shelar), अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे,  उद्योजक निरंजन हिरानंदानी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) डॉ. अमित सैनी, व बांधकाम व्यावसायिक बोमन ईरानी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर यामध्ये शासकीय अधिकारी, शिक्षण तज्ज्ञ, कॉर्पोरेट क्षेत्रातील पदाधिकारी, देणगीदार, समाजसेवक व नामवंत व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

स्नेहआशा  संस्थेच्या डिजिटल साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या संगणक प्रयोगशाळांमध्ये एकूण ६०० हून अधिक उच्च-क्षमता संगणक बसवण्यात आले असून या उपक्रमाचा ६ वी ते १० वी इयत्तांमधील १५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार आहे. संगणक साक्षरता, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा विश्लेषण यासारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे.

(हेही वाचा – राज्य महिला आयोगाची ‘Aarogya Wari’, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन)

या कार्यक्रमात शिष्यवृत्ती योजनेच्या तिसऱ्या बॅच अंतर्गत निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या योजना ‘सरस्वती’ (१० वीतील गुणवंत), ‘शक्ती’ (स्नातक शिक्षणासाठी) आणि ‘लक्ष्मी’ (पदव्युत्तर शिक्षणासाठी) अशा तीन उपघटकांमध्ये कार्यान्वित असून विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, मार्गदर्शन, संगणक साहित्य, कोचिंग व करिअर सल्ला यांचा समावेश असलेले व्यापक पाठबळ पुरवले जाते.

या प्रसंगी बोलताना स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा  सिद्धी जयस्वाल यांनी आपल्या भाषणात सांगितले, “जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितले की, त्यांना दिलेले लॅपटॉप वापरता येत नाहीत, तेव्हा आम्हाला जाणवले की डिजिटल अंतर कमी करणे ही केवळ तांत्रिक नव्हे तर सामाजिक गरज आहे. आजचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”

(हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेला आता राखीव साठ्यातून उचलावे लागणार नाही पाणी; काय आहे कारण?)

तसेच संस्थेच्या सहसंस्थापक व ट्रस्टी स्नेहा जयस्वाल यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की “शिक्षणाची केवळ उपलब्धता पुरेशी नाही; खरे परिवर्तन तेव्हा घडते जेव्हा संधीसमवेत सशक्तीकरण देखील दिले जाते. आमच्या प्रयोगशाळा म्हणजे केवळ संगणक असलेल्या खोल्याच नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निर्माण केलेले प्लॅटफॉर्म आहेत.”

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.