भारत – रशिया संबंध दृढ होण्यासाठी राजकीय कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक आदानप्रदान आवश्यक आहे असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक देवेंद्र पै यांनी केले आहे. रशिया आणि भारत यांच्यातील वैश्विक पातळीवरचे सहकार्य दृढ होण्यासाठी, तसेच रशियाच्या पब्लिक डिप्लोमसीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्ली येथे पहिली दोन दिवसीय भारत – रशिया फोरम परिषद (India – Russia Forum Conference) आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक सहभागी झाले होते. यामध्ये रशियामधूनही विद्यार्थी आणि अभ्यासक सहभागी झाले होते. या फोरमचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि बंगळूरुचे खासदार तेजस्वी सूर्या (MP Tejaswi Surya) यांच्या हस्ते झाले. (Devendra Pai)
(हेही वाचा – Monsoon Updates : कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा! मुंबईसह रायगड, रत्नागिरी, घाट परिसराला ऑरेंज अलर्ट)
या दोन दिवसीय फोरम परिषदेत बिल्डिंग ब्रिजेस ऑफ फ्रेंडशिप बिटवीन पीपल (Building Bridges of Friendship Between People) या विषयावरील चर्चासत्रात देवेंद्र पै बोलत होते. त्यावेळी त्यांनी ऐतिहासिक दाखले देत भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अजून दृढ कसे होऊ शकतात याबद्दल विवेचन केले. ते म्हणाले की” जसे लियो टॉलस्टॉय यांच्या विचारांनी गांधींना प्रेरणा मिळाली होती, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रशिया क्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेलिन यांची लंडनमध्ये झालेली भेट हीसुध्दा महत्त्वाची होती. यावरुन आपल्याला दिसते अनेक महत्त्वाच्या विषयांवर वैचारिक आदान प्रदान यापूर्वी होत होते. तसेच आजही होणे आवश्यक आहे.” अशा शब्दांत देवेंद्र पै यांनी आपली भूमिका विशद केली.
(हेही वाचा – Air India Plane Crash : एअर इंडिया मोठ्या विमानांचा वापर १५ टक्क्यांनी कमी करणार)
या अशा प्रकारे फोरम परिषद आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ होती या परिषदेस भारतीय परराष्ट्र मंत्रालय (Indian External Affairs Ministry) तसेच रशियन दूतावासानेही सहकार्य केले होते. या अशा परिषदांमुळे भारत आणि रशिया यांच्यातील वैचारिक आदानप्रदान वाढून आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य वाढेल अशी गरज या परिषदेत अधोरेखित केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

