Asmita Dey Gold Medal : वडिलांना दाखवता न आलेलं सुवर्ण पदक, अस्मिता डेची दु:खातून प्रेरणा घेतलेली कहाणी

Asmita Dey Gold Medal : वडिलांना दाखवता न आलेलं सुवर्ण पदक, अस्मिता डेची दु:खातून प्रेरणा घेतलेली कहाणी

75
Asmita Dey Gold Medal : वडिलांना दाखवता न आलेलं सुवर्ण पदक, अस्मिता डेची दु:खातून प्रेरणा घेतलेली कहाणी
Asmita Dey Gold Medal : वडिलांना दाखवता न आलेलं सुवर्ण पदक, अस्मिता डेची दु:खातून प्रेरणा घेतलेली कहाणी
  • ऋजुता लुकतुके

ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२६मध्ये भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे(Asmita Dey Gold Medal)ही केवळ विजेती खेळाडू नाही, तर संघर्ष, दु:ख आणि जिद्दीचे जिवंत उदाहरण ठरली आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय जुदोका ठरली. मात्र या ऐतिहासिक यशाच्या क्षणी तिला सर्वाधिक आठवण आली ती तिच्या दिवंगत वडिलांची.(Asmita Dey Gold Medal)

त्रिपुरातील दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात वाढलेल्या अस्मिताचे वडील सायकल मेकॅनिक होते. अत्यंत गरिबीत त्यांनी कुटुंबाचा सांभाळ केला. मातीच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाचे मासिक उत्पन्न अत्यल्प होते. तरीही मुलीने मोठे स्वप्न पाहावे, अशी प्रेरणा तिच्या वडिलांनीच दिली.(Asmita Dey Gold Medal)

अस्मिताने सांगितले की, तिच्या गावात मुलींनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न पाहणेही कठीण मानले जात होते. “लोक इतकी मोठी स्वप्ने पाहत नाहीत. पण बाबा नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले,” असे ती म्हणाली.(Asmita Dey Gold Medal)

(हेही वाचा – Assam Floods: आसाममधील विविध जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम, १ लाख ८२ हजार नागरिक अद्यापही बाधित; ३७९ गावांना पुराच्या पाण्याचा फटका )

मात्र सात महिन्यांपूर्वी मेंदूतील रक्तस्रावामुळे (ब्रेन स्ट्रोक) तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अस्मिता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. “मला वाटले सर्व काही संपले,” अशी भावना तिने व्यक्त केली. अनेक वेळा तिने खेळ सोडण्याचाही विचार केला होता.(Asmita Dey Gold Medal)

ग्लासगोतील अंतिम सामन्यात अस्मिता सुरुवातीला पिछाडीवर पडली होती. कॅनडाच्या हेडी क्वाचने आघाडी घेतल्यानंतरही अस्मिताने हार मानली नाही. तिने जोरदार पुनरागमन करत सामना गोल्डन स्कोअरपर्यंत नेला आणि निर्णायक क्षणी अप्रतिम डाव टाकत सुवर्णपदक जिंकले.(Asmita Dey Gold Medal)

विजयानंतर पदक हातात घेताच ती भावूक झाली. “हे पदक मी सर्वप्रथम बाबांना दाखवले असते, पण ते आता माझ्यासोबत नाहीत,” असे म्हणताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते.(Asmita Dey Gold Medal)

या सुवर्णपदकामुळे अस्मिता डेने भारतीय जुडोच्या इतिहासात नवे पान लिहिले. तिची ही कामगिरी केवळ पदकापुरती मर्यादित नसून, गरिबी, वैयक्तिक दु:ख आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणादायी कथा बनली आहे. तिच्या या यशाने देशभरातील असंख्य युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.(Asmita Dey Gold Medal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.