Asian Games 2023 : पाकिस्तानला धूळ चारत अंतिम फेरीत भारतीय संघ यांच्याशी करणार कबड्डी.. कबड्डी… कबड्डी

106
Asian Games 2023 : पाकिस्तानला धूळ चारत अंतिम फेरीत भारतीय संघ यांच्याशी करणार कबड्डी.. कबड्डी... कबड्डी

होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच शुक्रवार ६ ऑक्टोबर हा तेरावा दिवस आहे. अशातच आज भारताने आपला जुना प्रतिस्पर्धी पाकिस्तानला कबड्डीमध्ये धूळ चारली आहे. भारताने पाकिस्तानवर एकहाती विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

अधिक माहितीनुसार, भारताच्या पुरुष कबड्डी संघाने उपांत्य फेरीत (Asian Games 2023) पाकिस्तानविरुद्ध ६१ – १४ इतक्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर उद्या म्हणजेच ७ ऑक्टोबर शनिवारी दुपारी १२.३० वाजता इराण संघाविरुद्ध भारताची अंतिम फेरी रंगणार आहे. त्यामुळे भारताचे अजून एक पदक निश्चित झाले आहे.

(हेही वाचा – Asian Games 2023 : क्रिकेटमध्ये आणखी एक पदक निश्चित, बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत)

महिला कबड्डी संघही विजयी

पुरुषांप्रमाणे महिलांनीही कबड्डीच्या (Asian Games 2023) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला संघाने नेपाळवर ६१ – १७ असा सरळ विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे महिला कबड्डी संघाकडूनही एक पदक निश्चित झाले आहे.

त्यामुळे आता भारताच्या (Asian Games 2023) खात्यात २१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ३५ कांस्यसह एकूण ८८ पदकं आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.