Syria Drone Attack : सीरियाच्या लष्करी अकादमीवर भीषण ड्रोन हल्ला; 100 ठार, तर 125 जखमी

67
Syria Drone Attack : सीरियाच्या लष्करी अकादमीवर भीषण ड्रोन हल्ला; 100 ठार, तर 125 जखमी
Syria Drone Attack : सीरियाच्या लष्करी अकादमीवर भीषण ड्रोन हल्ला; 100 ठार, तर 125 जखमी

सीरियाच्या होम्स शहरात असलेल्या लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला झाला. (Syria Drone Attack) या हल्ल्यात 100 हून अधिक लोक मारले गेले. सरकारी प्रसारमाध्यमांनी या ड्रोन हल्ल्यासाठी दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले. SANA या अधिकृत वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. मृतांमध्ये लष्कराचे पदवीधर आणि नागरिक यांचा समावेश आहे. हा हल्ला ‘स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन’ने करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यावेळी अकादमीमध्ये पदवीदान समारंभ सुरू होता. लोक मैदानावर गेले होते आणि मग स्फोट झाला. तो बॉम्ब कुठून आला, हे कोणालाच समजत नव्हते, आजूबाजूला फक्त मृतदेह दिसत होते. या घटनेत सिरियाचे संरक्षण मंत्री अली महमूद अब्बास थोडक्यात बचावले. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच ते कार्यक्रमातून निघून गेले होते. ते निघाल्याबरोबर सशस्त्र ड्रोनने तेथे बॉम्बफेक आणि गोळीबार सुरू केला. (Syria Drone Attack)

(हेही वाचा – Sharad Ponkshe : ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यास नकार)

सीरियन लष्कराने या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा असलेल्या विरोधकांना जबाबदार धरले आहे. (Syria Drone Attack) मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. युद्धग्रस्त सीरियातील मोठा ड्रोन हल्ला म्हणून याकडे पाहिले जात आहे. सीरियाच्या लष्करी भागावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात रक्तरंजित हल्ला मानला जात आहे. सीरिया सरकारने या हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली आहे. सीरियाच्या सरकारी सैन्याने दिवसभर विरोधकांच्या ताब्यातील इदलिब भागात बॉम्बफेक केली. (Syria Drone Attack)

या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. इदलिब प्रदेशात स्वाथेस हयात तहरीर अल-शाम या संस्थेचे नियंत्रण आहे. त्याचे नेतृत्व अल-कायदाच्या पूर्वीच्या स्थानिक शाखेने केले आहे. या जिहादी गटाने यापूर्वी सरकारच्या ताब्यातील भागांवर हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे. २०११ मध्ये सीरियामध्ये अशा प्रकारच्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. त्यात आतापर्यंत हजारो सीरियन नागरिकांचे बळी गेले आहेत. (Syria Drone Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.