Abhishek Sharma 30-ball hundred T20 : ३० चेंडूंत टी-२० शतक अन् त्यानंतर मैदानातच योगमुद्रा; अभिषेक शर्माचं सेलिब्रेशन व्हायरल

Abhishek Sharma 30-ball hundred T20 : कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये अभिषेकने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

21
Abhishek Sharma 30 Ball Century : ३० चेंडूंत टी-२० शतक अन् त्यानंतर मैदानातच योगमुद्रा; अभिषेक शर्माचं सेलिब्रेशन व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

Abhishek Sharma 30-ball hundred T20                 अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने विक्रमी शतक ठोकत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या ३० चेंडूंत शतक पूर्ण करत त्याने भारतीय फलंदाजाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र, शतकापेक्षाही त्यानंतरच्या त्याच्या खास सेलिब्रेशनची चर्चा सोशल मीडियावर अधिक रंगली. (Abhishek Sharma 30-ball hundred T20)

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अभिषेकने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने ३४ चेंडूंत १०८ धावा केल्या. या खेळीत त्याने ११ षटकार आणि ९ चौकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल ३१७.६४ इतका होता. शतकासाठी त्याने ३० चेंडू घेतले आणि माजी कर्णधार रोहित शर्माचा २०१७ मधील ३५ चेंडूंत शतकाचा भारतीय विक्रम मागे टाकला. (Abhishek Sharma 30-ball hundred T20)

(हेही वाचा – TMC फुटीचा मोठा परिणाम! ममता बॅनर्जी, ऋतब्रत बॅनर्जी गटाकडून नाव-चिन्ह हिरावलं; आता पुढे काय?)

अभिषेकने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याचा आक्रमक खेळ आणखी वेगवान झाला. सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्येच त्याने २२ चेंडूंत ७६ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या सहा षटकांमध्ये एखाद्या फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली. भारताने त्याच्या तुफानी खेळीच्या जोरावर २० षटकांत २२१ धावा केल्या. (Abhishek Sharma 30-ball hundred T20)

शतक पूर्ण करताना अभिषेकने एक धाव घेतली आणि त्यानंतर त्याने हेल्मेट काढले, बॅट खाली ठेवली आणि मैदानावर बसून ध्यानधारणेच्या मुद्रेत काही क्षण डोळे मिटून बसला. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. फुटबॉलपटू एर्लिंग हालांडच्या प्रसिद्ध ध्यानमुद्रेच्या सेलिब्रेशनशीही चाहत्यांनी अभिषेकच्या या अंदाजाची तुलना केली. (Abhishek Sharma 30-ball hundred T20)

(हेही वाचा – एन. चंद्रशेखरन पुन्हा अध्यक्षपदी, Tata ट्रस्ट्सचा विरोध; नोएल टाटांचा नेमका आक्षेप काय?)

विशेष म्हणजे, अभिषेकचे वडील राजकुमार शर्मा स्टँडमध्ये उपस्थित होते. मुलाने शतक पूर्ण केल्यानंतर ते आनंदाने टाळ्या वाजवताना दिसले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याही चेहऱ्यावर अभिषेकच्या या विक्रमी कामगिरीनंतर आनंद दिसत होता. (Abhishek Sharma 30-ball hundred T20)

अभिषेकचे हे टी-२० आंतरराष्ट्रीयमधील तिसरे शतक आहे. ३० चेंडूंत शतक करत तो आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान शतकवीर ठरला आहे. त्याच्यापुढे एस्टोनियाचा साहिल चौहान २७ चेंडू आणि तुर्कीचा मुहम्मद फहाद २९ चेंडूंसह आहेत. (Abhishek Sharma 30-ball hundred T20)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.