Crime : मुंबईतील व्यावसायिकाकडे २.२५ कोटींची खंडणी; जयपूरमधील २ ‘ईडी’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

11
Crime : मुंबईतील व्यावसायिकाकडे २.२५ कोटींची खंडणी; जयपूरमधील २ 'ईडी' अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी

Crime              अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) जयपूर येथे कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी मुंबईतील एका व्यावसायिकाला कारवाईची भीती दाखवून तब्बल २.२५ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोरेगावच्या बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. (Crime)

विंट्री टेक प्रा. लि. चे मालक अमूल्य वस्सा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. २० जुलै रोजी मालाड पश्चिम येथील केन प्लाझा येथे असलेल्या वस्सा यांच्या कार्यालयात जयपूर ईडीचे सहायक संचालक मोहित गर्ग (३६) आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता (३५) आले. त्यांनी वस्सा यांच्यावर गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशांच्या गैरव्यवहाराचा खोटा आरोप केला. (Crime)

(हेही वाचा – एन. चंद्रशेखरन पुन्हा अध्यक्षपदी, Tata ट्रस्ट्सचा विरोध; नोएल टाटांचा नेमका आक्षेप काय?)

कोणताही अधिकृत कागदोपत्री पुरावा न दाखवता या दोघांनी शोध, जप्ती आणि अटकेची धमकी दिली. त्यांनी सुरुवातीला ५ कोटी रुपयांची मागणी केली; अखेर २.२५ कोटी रुपयांवर तडजोड झाली. वाटाघाटींनंतर दुसऱ्या दिवशी तक्रारदाराने आरोपींना १ कोटी रुपये दिले. उर्वरित १.२५ कोटी रुपयांसाठी आरोपींनी दिल्लीतील एका मॉलमध्ये वस्सा यांच्या साथीदारांची भेट घेतली. तिथे प्रकरण मिटल्याचे बनावट कागदपत्र दाखवून उर्वरित रक्कम उकळण्यात आली. एवढ्या मोठ्या रकमेनंतरही आरोपींनी वरिष्ठ अधिकारी नाराज असल्याचे सांगत अतिरिक्त पैशांची आणि दरमहा नियमित हप्त्यांची मागणी सुरूच ठेवली. (Crime)

संशय आल्याने वस्सा यांनी अधिक चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्राथमिक चौकशीत हे दोन्ही आरोपी प्रत्यक्षात ईडीचेच कार्यरत अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून कट रचल्याप्रकरणी आता या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.