Kho Kho State Championship : राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा गुरुवारपासून परभणीत

गुरुवारपासून परभणीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सुरू होत आहे. ही निवड स्पर्धा आहे आणि यात राज्यभरातून ४८ संघ सहभागी होणार आहेत. 

137
Kho Kho State Championship : राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा गुरुवारपासून परभणीत
Kho Kho State Championship : राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा गुरुवारपासून परभणीत
  • ऋजुता लुकतुके

गुरुवारपासून परभणीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सुरू होत आहे. ही निवड स्पर्धा आहे आणि यात राज्यभरातून ४८ संघ सहभागी होणार आहेत. (Kho Kho State Championship)

गुरुवारपासून (दि.१७) सुरू होणाऱ्या पुरुष व महिलांच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी परभणीतील श्री. शिवाजी महाविद्यालयाचं मैदान सज्ज झालं आहे. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनची मान्यता असलेली आणि परभणी जिल्हा खो-खो असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातील महिला व पुरुष गटाचे ४८ संघ सहभागी होणार आहेत. (Kho Kho State Championship)

२० नोव्हेंबरला स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे आणि या स्पर्धेनंतरच महाराष्ट्राच्या खो खो संघाची निवड होईल. (Kho Kho State Championship)

या स्पर्धेसाठी ४ अद्यायावत मैदाने तयार करण्यात आली असून भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. खेळाडूंबरोबरच राज्य खो-खो संघटनेचे पदाधिकारी, तांत्रिक व पंच समिती असे अकराशे जणांची निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. (Kho Kho State Championship)

सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था ज्ञानसाधना प्रतिष्ठान, जिंतूर रोड परभणी येथे तर पंचाधिकारी, पदाधिकारी यांची निवास व्यवस्था शासकीय विश्रामगृह, कृषी विद्यापीठ वसतिगृह, हॉटेल्स आदी ठिकाणी करण्यात आली आहे. त्यांची निवासस्थान ते स्पर्धास्थळापर्यंत ने-आण करण्यासाठी संघटनेच्या वतीने वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोतात खेळवण्यात येत आहे. (Kho Kho State Championship)

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन परभणी जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब जामकर यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव प्रा. डॉ. पवन बारहाते पाटील, संतोष सावंत, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, रणजीत जाधव, प्रकाश टाकळे, राम चोखट व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत. (Kho Kho State Championship)

या स्पर्धेसाठी पुढील निवड समिती काम पाहणार आहे. किशोर पाटील (ठाणे), सुरेंद्र विश्वकर्मा (मुंबई), विजय बनसोडे (नाशिक), डॉ. वृषाली वारद (धाराशिव). (Kho Kho State Championship)

(हेही वाचा – Aus vs SA Semi Final : विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर २१३ धावांचं आव्हान)

स्पर्धेची गटवार विभागणी पुढील प्रमाणे केली आहे.

पुरुष: अ-गट: मुंबई उपनगर, अहमदनगर, सिंधुदुर्ग. ब-गट: पुणे, परभणी, रायगड. क-गट: ठाणे पालघर, लातूर. ड-गट: सांगली, नंदुरबार, जळगाव. इ-गट: नाशिक, संभाजीनगर, नांदेड. फ-गट: मुंबई, रत्नागिरी, सातारा. ग-गट : सोलापूर, धुळे, हिंगोली. ह-गट: धाराशिव, बीड, जालना. (Kho Kho State Championship)

महिला: अ-गट: पुणे, जालना, सिंधुदुर्ग. ब-गट: ठाणे, रायगड, परभणी. क-गट: धाराशिव, धुळे, जळगाव. ड-गट: रत्नागिरी, पालघर, लातूर. इ-गट: सोलापूर, सातारा, नंदुरबार. फ-गट: सांगली, संभाजीनगर, हिंगोली. ग-गट: नाशिक, अहमदनगर, नांदेड. ह-गट: मुंबई, मुंबई उपनगर, बीड. (Kho Kho State Championship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.