Veer Savarkar : सावरकरांची राजनीती आणि विश्वगुरू हिंदुस्थान

राष्ट्रहिताचा विचार करून सर्व क्षेत्रात भराऱ्या मारणारा सामर्थ्य संपन्न हिंदुस्थान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न होते. आज ते स्वप्न हळूहळू आकाराला येत असल्याचे अनुभवास येत आहे. भौतिक, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्ट्या झालेल्या प्रगतीला आणि विकासाला महत्व आहे. मात्र केवळ तेवढ्यावर समाधान मानता येणार नाही. याच्या जोडीला मानवाचा गुणविकासही होणे नितांत आवश्यक आहे.

118
Veer Savarkar : सावरकरांची राजनीती आणि विश्वगुरू हिंदुस्थान
  • दुर्गेश जयवंत परुळकर

गेली दहा वर्षे हिंदुस्थानातील राजकीय वातावरणात होत असणारा बदल मनाला आनंद आणि उभारी देणारा आहे. कोविडसारख्या संसर्गजन्य रोगाने संपूर्ण जगात प्रचंड दहशत निर्माण केली.‌ मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अशा बिकट परिस्थितीत हिंदुस्थानने कोविड रोगावर मात करणारी आणि माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी लस निर्माण केली. ही लस विविध देशांना उपलब्ध करून दिली. अशा बिकट प्रसंगात हिंदुस्थानने जगातल्या विविध देशांना आधार दिला. घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्या घरातील आबालवृद्धांना सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करावी त्याप्रमाणे हिंदुस्थानने केवळ आपल्या नागरिकांची काळजी घेण्याचा प्रयत्न न करता विश्वबांधवांचाही विचार करून त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य केले. (Veer Savarkar)

विज्ञानाच्या क्षेत्रात आज हिंदुस्थानमध्ये वेगाने प्रगती होत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी आजपर्यंत जगातल्या कोणत्याही देशाने आपले यान उतरवले नाही अशा भागात हिंदुस्थानने यान उतरवून संपूर्ण जगाला अचंबित केले आहे. केवळ भूतलावरच नव्हे तर अंतरिक्षात सुद्धा हिंदुस्थानने भरीव कामगिरी केली आहे.‌ विविध देशातील उपग्रहांना अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी हिंदुस्थानने पुढाकार घेऊन घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.‌ देशातील विकासाची कामे ही अत्यंत वेगाने होत आहेत. शस्त्रास्त्र, आर्थिक, वैज्ञानिक दृष्ट्याही हिंदुस्थान सक्षम झाला आहे.‌ आत्मनिर्भरता हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कटिबद्ध असलेला हिंदुस्थान आपल्या ध्येयपथावरून घोडदौड करत आहे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर एक द्रष्टे हिंदूसंघटक!)

राष्ट्रहिताचा विचार करून सर्व क्षेत्रात भराऱ्या मारणारा सामर्थ्य संपन्न हिंदुस्थान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) स्वप्न होते. आज ते स्वप्न हळूहळू आकाराला येत असल्याचे अनुभवास येत आहे. भौतिक, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्ट्या झालेल्या प्रगतीला आणि विकासाला महत्व आहे. मात्र केवळ तेवढ्यावर समाधान मानता येणार नाही. याच्या जोडीला मानवाचा गुणविकासही होणे नितांत आवश्यक आहे. देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रनिष्ठा, राष्ट्राभिमान, आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, परंपरेचा अभिमान बाळगणे आणि तो व्यक्त करणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असलेले वातावरण देशात निर्माण करण्याचे कर्तव्य शासनाचे असते. हिंदुस्थानात विद्यमान असलेले शासन सावरकरांच्या मार्गाने वाटचाल करत असलेले आढळून येत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे राजकारणाचे हिंदूकरण होण्यास आता आरंभ झाला आहे. (Veer Savarkar)

श्रीरामांनी रावणाचा पराभव करून आपला दरारा निर्माण केला. त्यांनी आपला अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडल्यानंतर कोणत्याही राजाने तो अडवण्याचा प्रयत्न केला नाही.‌ श्रीराम केवळ पराक्रमी शूर राजे नव्हते तर ते दानवीर होते, मानवतेचा पुतळा होते. खऱ्या अर्थाने जगमित्रराजा म्हणून श्रीरामांचा लौकिक होता. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) हिंदुत्व या ग्रंथात श्रीरामांचा गौरव करताना लिहिले… (Veer Savarkar)

“अयोध्येच्या महाप्रतापी राजा रामचंद्राने जेव्हा लंकेत आपले विजयी पाऊल टाकले आणि उत्तर हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंतची सर्व भूमी एक छत्री सत्तेखाली आणली त्याच दिवशी स्वराष्ट्र, स्वदेश निर्मितीचे जे महान कार्य सिंधूंनी अंगीकृत केले होते त्या कार्याची परिपूर्ती झाली. भौगोलिक मर्यादेच्या दृष्टीने त्यांनी अंतिम सीमा हस्तगत केली. ज्या दिवशी अश्वमेधाचा विजयी घोडा कोठेही प्रतिरोध न होता अजिंक्य असाच अयोध्येला परत आला त्या दिवशी त्या अप्रमेय अशा प्रभू रामचंद्रांच्या, त्या लोकाभिराम रामभद्राच्या साम्राज्य सिंहासनावर सम्राटाच्या चक्रवर्तीत्वाचे निदर्शक असे भव्य श्वेत छत्र धरले गेले, ज्या दिवशी आर्य म्हणणाऱ्या नृपश्रेष्ठांनीच नव्हे तर भक्तिपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनीही त्या सिंहासनाला आपली भक्तिपूर्वक राजनिष्ठा सादर केली. तोच दिवस आपल्या खऱ्याखुऱ्या हिंदूराष्ट्राचा, हिंदूजातीचा जन्मदिवस ठरला. तोच खरा आपला राष्ट्रीय दिन! कारण आर्यांनी आणि अनार्यांनी यांनी एकमेकात पूर्णपणे मिसळून एका नवीन अशा संघटित राष्ट्राला त्या दिवशी जन्म दिला. या दिवशी पूर्वीच्या सर्व पिढ्यांचे प्रयत्न फळाला येऊन त्यावर राजकीय दृष्ट्या यशाचा कळसच चढवला. त्यानंतरच्या सर्व पिढ्या ज्या करिता बुद्धिपुरस्सर किंवा अबुद्धिपुरस्सर झुंजल्या आणि झुंजता झुंजता प्रसंगी पडल्या. त्या समान ध्येयाचा, समान ध्वजाचा, समान कार्याचा वारसा तेव्हापासून हिंदूजातीकडे परंपरेने चालत आला.” (Veer Savarkar)

सावरकरांनी (Veer Savarkar) याच दिवसाला हिंदू राष्ट्राचा जन्मदिवस म्हणून गौरवले आहे. श्रीरामांविषयी हिंदू समाजाच्या मनात कोणत्या भावना आहेत त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वरील प्रमाणे हिंदुत्व या ग्रंथात व्यक्त केल्या आहेत. म्हणून सावरकर म्हणतात हिंदू ज्या दिवशी श्रीरामांना विसरतील त्या दिवशी हिंदूंना राम म्हणावे लागेल. याचा अर्थ श्रीरामांचे विस्मरण म्हणजे हिंदूंच्या विनाशाचा आरंभ होय. विद्यमान सरकारने श्रीराम मंदिराची निर्मिती करून श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा केली. परकीय आक्रमकांनी नष्ट केलेले मंदिर प्रचंड जल्लोषात निर्माण केले. हिंदूंना श्रीरामांचे विस्मरण झाले नाही ही गोष्ट जगाच्या निदर्शनास आणून दिली.‌ तसेच आम्ही श्रीरामचंद्रांचे वंशज असून त्यांची परंपरा आम्ही पुढे चालवणार आहोत असा संदेश श्रीरामांच्या मंदिराची निर्मिती करून दिला आहे. एवढेच नाही तर दुबईला मुस्लिम साम्राज्यात श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली. हिंदू संस्कृतीचा विजयी घोडा आज जगभर दौडत जात आहे. हिंदुस्थानच्या विचारांकडे मतांकडे संपूर्ण जग आदराने पाहत आहे. हिंदुस्थानची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा सर्वश्रेष्ठ असून त्याचा परिचय संपूर्ण जगाला करून देणे क्रमप्राप्त आहे. (Veer Savarkar)

वसुधैव कुटुंबकम आणि कृण्वंतो विश्वंआर्यम् ही वेदांची उद्घोषणा सार्थ करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. त्या दृष्टीने आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे.‌ जगात वाढत असलेली वैचारिक आणि मानसिक विकृती, आततायीपणा, गुणबळाकडे दुर्लक्ष करून केवळ संख्याबळाला देण्यात येणारे अवाजवी महत्त्व मानवी समाजाला घातक आहे. रामायणाचा आणि वेदांचा थोर ऐतिहासिक वारसा आपल्या देशाला लाभला आहे. त्याच्या आधारे आपण विश्वगुरू होऊ शकतो असा विश्वास आपल्या ऋषीमुनींनी आपल्यात निर्माण केला आहे. ते लक्षात घेऊनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) वेदांमृत सर्वांना पिऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले जरांगे पुन्हा अंतरवालीत दाखल; आंदोलकांना म्हणू लागले ‘घरी जा’)

जगातले संपूर्ण क्षात्रतेज नष्ट होऊन कोणताही लाभ होणार नाही. मानवी समाजाला ज्ञान, शौर्य, शस्त्रबळ, व्यापार, भौतिक सुखसोयींची नितांत आवश्यकता असते. या सर्व गोष्टींची पूर्तता करणारा समाजातला प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्याचे रक्षण करणे, त्याला योग्य प्रकारे सांभाळणे आणि संवर्धन करणे हे प्रधान कर्तव्य आहे. अत्याचार सहन करायचा नाही कारण तो सहन केला तर अत्याचार करणाऱ्यांचे धैर्य वाढेल, मनोबल वाढेल. यासाठी त्याचा प्रतिकार करणे नितांत आवश्यक आहे. तथापि प्रतिकारालाही मर्यादा आहे. अमर्याद प्रतिकाराने समाज नि:सत्व, निर्बल आणि निस्तेज होण्याचा धोका असतो याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. असा विचार देणारा आपला धर्म आपली संस्कृती जगात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सांप्रत काळात याच जीवन मूल्यांना महत्त्व आहे. क्षात्रतेज नसेल तर अत्याचाराला ऊत येईल. या अत्याचारामुळे मानवी समाजाचे अध:पतन खचितच होणार आहे. याचा विचार ज्ञानी लोकांनी करायचा आहे. त्यासाठी वैचारिक बौद्धिक आणि ज्ञानाच्या बळावर आदर्श समाज निर्माण करण्याचे दायित्व पर्यायाने आपल्या खांद्यावर आहे. संपूर्ण जग एक कुटुंब आहे अशी भावना समाजात निर्माण करण्यासाठी आपल्या ऋषींनी क्षात्रतेज आणि ब्रह्मतेजाचा परिस्थितीप्रमाणे योग्य प्रमाणात उपयोग केला. आपल्यालाही त्याच मार्गाने वाटचाल करावी लागणार आहे. विश्वाचा कुटुंब म्हणून विचार करताना आपण आपल्या भारत मातेला विसरायचे नाही हे तेवढेच खरे आहे. म्हणूनच गुण बळाकडे लक्ष देणे नितांत आवश्यक आहे.‌ (Veer Savarkar)

गुण-सुमने मी वेचियली या भावे।
की तिने सुगंधा घ्यावे
जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मी जे गुण संपादन केले आहेत त्या गुणांचा उपयोग माझ्या भारतमातेचा उद्धार करण्यासाठी खर्च झाला पाहिजे. तसा तो उपयोगात आणला नाही तर अकारण मी विद्येचा भार वाहतो आहे असा अर्थ होईल. सावरकरांच्या (Veer Savarkar) विचारांचे हे संस्कार विद्यार्थ्यांवर, तरुणांवर करून त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करण्यासाठी आणि राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. संपूर्ण विश्वाचे नेतृत्व करण्याचे दायित्व आपण स्वीकारल्यावर साहजिकपणे आपल्या देशाचा, धर्माचा आणि संस्कृतीचा लौकिक विश्वात पसरणार आहे. परिणामी न्याय, नीती, शिस्त, सत्य याचा सन्मान राखणारा मानवी समाज भूतलावर अवतीर्ण करता येईल. अराजकता, असंतोष, उपद्रमूल्य यांना कोठेही स्थान राहणार नाही.‌ (Veer Savarkar)

हिंदू संस्कृतीच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेला सज्जन समाज हा सत्य, न्याय, नीतीला अनुसरून जीवन जगत असतो. आततायीपणाने वागणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या समाजाचे वर्तन पाहून तो संतप्त झाला आणि त्याने रौद्ररूप धारण केले तर त्याच्या त्या रौद्ररूपासमोर कोणतीही राक्षसी वृत्ती तग धरू शकत नाही. असत्य, अधर्म, अनैतिकता याच्या विरोधात भक्कमपणे पाय रोवून समर्थपणे त्यावर मात करण्याची नैसर्गिक क्षमता ब्रह्मतेजाने तळपणाऱ्या मानवी समाजात असते. याची अनुभूती आपल्याला जगाला करून द्यायची आहे. ते दायित्व आपले आहे. या सर्व गोष्टींशी जगातील अन्य धर्म आणि संस्कृती अपरिचित आहे. म्हणूनच आपल्याला जगाला नव्याने वेदांचा परिचय करून द्यायचा आहे. सनातन धर्माचे अविनाशित्व जगाला पटवून देण्याचे दायित्व आपलेच आहे. वैदिक ज्ञानाच्या बळावर आपल्याला अशा प्रकारचा समाज निर्माण करता येईल हा विश्वास अखिल मानवी समाजाला देणे आपले धार्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे, याचे विस्मरण होऊन न देणे म्हणजेच आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे होय. (Veer Savarkar)

जनं बिभ्रति बहुधा वि – वाचसं
नाना धर्माणं पृथिवी यथा ओकसम् ।
सहस्रं धारा: द्रविणस्य मे दुहां
ध्रुवा इव धेनु: अनपस्फुरन्ती ।
(अथर्ववेद काण्ड १२, सुक्त १, ऋचा ४५)

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिवादन)

आशय – अनेक धर्माच्या आणि अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांना सामावून घेणारी ही आमची मातृभूमी दुधारू गाईप्रमाणे आम्हाला धन, ऐश्वर्य, सुख आणि समाधान प्रदान करो. हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र शांतता आणि सहिष्णुता या दोन तत्त्वांवर जगात वावरत असली तरी यस्यां देवा: असुरान् अभिअवर्तयन् (अथर्ववेद काण्ड १२, सुक्त १, ऋचा ५) आशय – आमच्या देशात विद्वान, शूरवीर, व्यापारी यांनी एकत्र येऊन हिंसक, आततायी आणि दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला. ब्रह्मतेजाने आणि क्षात्रतेजाने भारलेला मानवी समाज अस्तित्वात असेल तर तो मानवी समाज अत्यंत उच्च कोटीचा असतो. अशी शिकवण देणारे वेद सर्वांसाठी मुक्त केले गेले पाहिजेत असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) केले ते या कारणासाठी. (Veer Savarkar)

आजचे विद्यमान सरकार अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्नशील होत असल्याचे आढळते आहे.
विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करणारा आपला देश मानवी जीवनाला आवश्यक असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ होऊन अध्यात्मिक आणि तात्विक मार्गदर्शन करण्यासाठी पात्र ठरला पाहिजे. तशा प्रकारचा आपल्या देशात समाज निर्माण करण्याचे दायित्व आपले आहे. सावरकरांची विचारधारा याचाच पाठपुरावा करणारी आणि मार्गदर्शन करणारी आहे. सर्व देशांच्या सीमा पुसून टाकून आणि संपूर्ण पृथ्वी एक राज्य म्हणून अस्तित्वात आली तर आम्हाला सर्वात आनंद होईल अशा अर्थाचे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) काढले आहेत. त्या दृष्टीने होणारी आपली वाटचाल म्हणजे विश्वगुरू होण्याच्या सिद्धतेच्या दिशेने आरंभलेला हा प्रवास आहे. आपल्या संस्कृतीचे आणि आपल्या ऐतिहासिक पुरुषांचे स्वप्न साकार होण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्या देशात आणि विश्वात निर्माण होत आहे ही आपल्या कार्याला गतिमानता देण्यासाठी निर्माण झालेली सुवर्णसंधी आहे. मानवी समाजाच्या कल्याणार्थ आपण कंबर कसून कामाला लागले पाहिजे! आपल्या देशाच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षात या घटना घडत असून हा आपल्यासाठी शुभ शकुन आहे.‌ (Veer Savarkar)

(लेखक वीर सावरकर अभ्यासक आणि व्याख्याते आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.