Chilkur Balaji Temple : ऐकावे ते नवलंच! चिल्कुर बालाजी मंदिरात दर्शन घेतल्यावर परदेशात जाण्याची मिळते संधी…

55
Chilkur Balaji Temple : ऐकावे ते नवलंच! चिल्कुर बालाजी मंदिरात दर्शन घेतल्यावर परदेशात जाण्याची मिळते संधी...
Chilkur Balaji Temple : ऐकावे ते नवलंच! चिल्कुर बालाजी मंदिरात दर्शन घेतल्यावर परदेशात जाण्याची मिळते संधी...

चिल्कुर बालाजी मंदिराला (Chilkur Balaji Temple) “व्हिसा बालाजी मंदिर” म्हणूनही ओळखले जाते. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील ओसमान सागराच्या काठावर हे मंदिर आहे. हे भगवान व्यंकटेश्वराचे अवतार, भगवान बालाजी यांना समर्पित प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर तेलंगणातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि १००० वर्षांहून अधिक जुने आहे. (Chilkur Balaji Temple)

चिलकुर बालाजी मंदिराला (Chilkur Balaji Temple) “व्हिसा बालाजी मंदिर” म्हणूनही ओळखले जाते कारण हे मंदिर परदेशात जाण्यासाठी व्हिसा घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते. भाविक मन शांत करण्यासाठी आणि येथील अरण्यातील एकांतात ध्यान करण्यासाठी येथे येतात. त्याचबरोबर या मंदिराची वास्तुकला पाहण्यासारखी आहे. (Chilkur Balaji Temple)

(हेही वाचा- Brazil Flood: ब्राझीलमध्ये महापूराचे थैमान! आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू)

हे मंदिर हजारो वर्षांपूर्वी बांधले गेले होते आणि १९६३ मध्ये त्यात अम्मावरूची मूर्ती बसवण्यात आली. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या तीन हातात कमळाची फुले आहेत आणि चौथा हात कमळाच्या खाली असून शरणागतीचे प्रतीक आहे. एका आख्यायिकेनुसार तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी एक भक्त नेहमी जात होता. पण तब्येत बिघडल्यामुळे तो एका वर्षी जाऊ शकला नाही. (Chilkur Balaji Temple)

मग भगवान व्यंकटेश त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले “मी इअथल्या जंगलातच आहे. तुला दूर जायची गरज नाही.” देवाने स्वप्नात ज्या ठिकाणी यायला सांगितले, तिथे तो भक्त गेला आणि खणू लागला. त्याला तिथे भगवान बालाजीची मूर्ती  सापडली. मूर्तीतून रक्त येत होते आणि जमिनीवर पडत होते. अचानक त्याला एक आवाज ऐकू आला, “जिथे रक्त सांडले आहे, तिथे दूध ओत.” देवाच्या आदेशानुसार त्याने तसे केले व त्याला श्रीदेवी आणि भूदेवीची मूर्ती मिळाली. त्यानंतर तिथे एक मंदिर बांधण्यात आले. (Chilkur Balaji Temple)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: २३ देशांमधील ७५ निवडणूक व्यवस्थापन प्रतिनिधी महाराष्ट्राचा दौरा करणार; कसे असेल स्वरुप?)

हे तेलंगणातील सर्वात जुने मंदिर आहे आणि हे मंदिर भक्त रामदास यांचे काका अक्कन्ना आणि मदन्ना यांनी बांधले होते. या मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई आहे. या थळी येऊन एक वेगळाच आनंद उत्पन्न होतो आणि मन अगदी शांत निरायम होऊन जाते. (Chilkur Balaji Temple)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.