Veer Savarkar : साहित्यिकांची भगूर येथील सावरकर स्मारकात जागर यात्रा

गदिमांचे निवासस्थान असलेली पुण्यातील पंचवटी ते नाशकातील कुसुमाग्रजांची पंचवटी अशी साहित्य जागर यात्रा पिंपरी चिंचवड येथील साहित्य प्रेमींनी आयोजित केलेली यात्रा भगूर येथील सावरकर स्मारकात संपन्न झाली.

22
Veer Savarkar : साहित्यिकांची भगूर येथील सावरकर स्मारकात जागर यात्रा
Veer Savarkar : साहित्यिकांची भगूर येथील सावरकर स्मारकात जागर यात्रा

पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे ३५ साहित्यिकांनी एकत्र येत साहित्य जागर यात्रेचे आयोजन केले. पुण्यातील वाकडेवाडी येथील गदिमांचे निवासस्थान असलेल्या पंचवटी बंगल्यात गदिमांना अभिवादन करून सुरू झालेली ही यात्रा नाशिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे कुसुमाग्रजांना मानवंदना देण्यासाठी पोहोचली. प्रतिष्ठानच्यावतीने विश्वस्त कवी प्रकाश होळकर, अरविंद ओढेकर आणि प्राचार्य मकरंद हिंगणे, किरण भावसार यांनी यात्रेचे स्वागत केले.

नाशिकचे कवी प्रशांत केंदळे आणि राजेंद्र उगले यांनी आपल्या कविता सादर केल्या. साहित्य जागर यात्रेतील सहभागी साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतींच्या एकेक प्रती कुसुमाग्रज प्रतिष्ठानला भेट दिल्या. प्रकाश होळकर आणि मकरंद हिंगणे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली. त्रंबक रस्त्यावरील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानालाही भेट देऊन साहित्यिकांनी अभिवादन केले.

(हेही वाचा- Ajit Pawar : “मी कुणाच्याही दबावाला भीक घालत नाही” : अजित पवारांची विरोधकांवर टीका)

साहित्य जागर यात्रेदरम्यान भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या सावरकर वाड्यालाही भेट देण्यात आली. वंदे मातरमचा जयघोष करत सावरकरांच्या आठवणी जागवत, देशभक्तीपर कविता सादर करीत छोटेखानी संमेलन तेथे सादर करण्यात आले. गुणवंत कामगार प्रशांत कापसे व साहित्यिक नंदन रहाणे यांनी भगूरकरांच्या वतीने साहित्य जागर यात्रेचे स्वागत केले.

कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या नेतृत्वाखालील या साहित्य यात्रेत सुरेश कंक, सुभाष चव्हाण, कैलास भैरट, अशोक मोरे, एकनाथ उगले, सौ. मनीषा उगले, शोभा जोशी, विलास कुंभार, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे, श्रीकांत चौगुले, प्रकाश घोरपडे, जयश्री श्रीखंडे, प्रदीप गांधलीकर, नंदकुमार कांबळे, साहिल कांबळे,भाऊसाहेब गायकवाड, फुलवती जगताप, मुरलीधर दळवी, सानिका कांबळे, वंदना गायकवाड, शामराव सरकाळे, हेमंत जोशी, सुभाष चटणे, बाळकृष्ण अमृतकर, संजय गमे, जयश्री गुमास्ते, जयवंत भोसले, प्रभाकर वाघोले, सुरेंद्र विसपुते, नारायण कुंभार, प्रतिमा कुंभार आदी साहित्यिक सहभागी झाले होते.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.