Maratha Reservation : ठाण्यात कडकडीत बंद; जाणून घ्या काय काय आहे बंद

या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला आहे

23
Maratha Reservation : ठाण्यात कडकडीत बंद; जाणून घ्या काय काय आहे बंद

एकीकडे मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट आरक्षण देण्यासाठी दिलेली ४ दिवसांची मुदत संपताच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (१० सप्टेंबर) सलाइन काढली तसेच पाणी पिणेही बंद केले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी आज म्हणजेच सोमवार ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

अशातच जालन्यातील मराठा आंदोलनात (Maratha Reservation) झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे आज म्हणजेच सोमवार ११ सप्टेंबर रोजी ठाणे बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ, टेंभीनाका कोपरी, वागळे इस्टेट भागातील दुकाने बंद आहेत. सध्या टीएमटीची वाहतूक सुरळीत आहे. तर रिक्षांची संख्या दररोजच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. तसेच बंदमुळे शाळा सुरू आहेत की नाही या बाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे मोर्चातील सहभागी मराठा नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, तोडगा निघण्याची शक्यता)

ठाणे शहरात बंद (Maratha Reservation) दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात तैनात आहेत. पोलिसांनी सकाळी ७.३० वाजल्यापासून बाजारपेठेत दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही दुकानदारांनी दुकाने स्वतः बंद ठेवून बंद मध्ये सहभाग घेतला. शहरातील ठाणे बाजारपेठ, कोपरी काही अंतर्गत भागात दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा आम्ही बंद (Maratha Reservation) करत नसल्याचा तसेच शांततेत बंद पाळला जात असल्याचा दावा सहभागी पक्षाचे नेते करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.