Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, तोडगा निघण्याची शक्यता

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत

22
Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, तोडगा निघण्याची शक्यता

एकीकडे मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट आरक्षण देण्यासाठी दिलेली ४ दिवसांची मुदत संपताच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (१० सप्टेंबर) सलाइन काढली तसेच पाणी पिणेही बंद केले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी आज म्हणजेच सोमवार ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी (Maratha Reservation) सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख – प्रतिनिधी हजर राहणार आहेत. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात रविवारी झालेल्या भाषणातून दिली.

आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. आधीच जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला होता. तसेच त्यांच्या किडनीवरदेखील परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले. त्यामुळे पाणी न घेणे आणि उपचारासाठी नकार देण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम हाेऊ शकतो. जरांगे यांच्या या निर्णयामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची कोठडी)

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या काही दिवसापासून आंदोलन (Maratha Reservation) सुरू आहे. मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. आंदोलकांच्या मागणीनुसार राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजासाठी जीआर काढला होता.

या जीआरमध्ये मराठवाडय़ातील मराठा-कुणबी समाजाला (Maratha Reservation) वंशावळ अन्य पुरावे असल्यास कुणबी प्रमाणपत्रे दिली जातील, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. परंतु, मराठवाडय़ातील मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाकडे निजामकालीन व हैदराबाद संस्थानाकडील वंशावळ नोंदी, पुरावे नसल्याने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

त्यामुळे मराठा समाजाचा (Maratha Reservation) आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजची बैठक बोलावली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.