इंदापूरमध्ये शिकाऊ विमान कोसळले, महिला पायलट जखमी

119

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कडबनवाडीमध्ये शिकाऊ विमान कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात महिला पायलट किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज आहे. हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले.

शिकाऊ विमान कोसळले, महिला पायलट जखमी

स्थानिकांच्या मदतीने या महिला पायलटवर उपचार करण्यात आले असून, गंभीर दुखापत नसल्याची माहिती समोर येत आहे. या विमानाने सोमवारी सकाळी बारामतीहून उड्डान केले होते. दरम्यान विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी परिसरात आले असता अचानक कोसळले. विमान कशामुळे पडले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत सुदैवाने पायलट बचावली आहे. मात्र विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत पायलटला सुरक्षित विमानातून बाहेर काढले.

( हेही वाचा : Monsoon Road Trip : पावसाळ्यात रोड ट्रिपसाठी ‘हे’ आहेत देशातील सर्वात सुंदर मार्ग)

विमान शेतात कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारीच असलेल्या पोंदकुले वस्तीतील तरुणांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. हे तरूण घटनास्थळी पोहोचले असता त्यांना विमानाचा अपघात झाल्याचे आढळले. त्यानंतर या तरुणांनी महिला पायलटची विमानातून सुखरूप सुटका केली. या घटनेमध्ये महिला पायलट ही किरकोळ जखमी झाली असून त्यांना औषध उपचार करून शेळगाव येथील नवजीवन हॉस्पिटल शेळगावमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कारवार एव्हिएशनचे कर्मचारी दाखल झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.