….म्हणून दुर्गराज रायगडावर पाच दिवस पर्यटकांना बंदी!

74

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडला ७ डिसेंबर रोजी किल्ले रायगडला भेट देणार आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना ते अभिवादन करणार आहेत. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारल्यानंतर ७ डिसेंबर रोजी ते रायगडावर येत आहेत, अशी माहिती खासदार भोसले यांनी दिली होती. राष्ट्रपती रायगडाला भेट देणार, ही सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तत्पूर्वी ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडवर येण्यास पर्यटकांना बंदी असणार आहे.

म्हणून रायगड पर्यटकांसाठी राहणार बंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला किल्ले रायगडला भेट देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत किल्ला आणि रोपवेदेखील पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मोबाईलवर बोलणं आता पडणार महागात! वाचा, नवा केंद्रीय मोटार वाहन कायदा)

स्वराज्याची राजधानी सजणार

तसेच, राष्ट्रपती रायगडावर येत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. माणगाव-घरोशीवाडीमार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग बंद हा निर्णय करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच स्वराज्याची राजधानी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी सजणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु होणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.