प्रदूषणाला अटकाव! आता दिल्लीत धावणार ग्रीन हायड्रोजनवरील वाहनं

125

राष्ट्रीय शिखर परिषदेला संबोधित करताना, केंद्रीय परिवहन मंत्री म्हणाले की त्यांनी फरीदाबादच्या तेल संशोधन संस्थेत उत्पादित ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी केली आहे. आता ते ही कार दिल्लीत चालवणार आहेत जेणेकरून लोकांना विश्वास पटेल, की पाण्यातून ग्रीन हायड्रोजन मिळणे शक्य आहे. शहरांमधील सांडपाणी आणि घनकचरा वापरून तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर बस, ट्रक आणि कार चालवण्याची माझी योजना आहे, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

सांडपाण्यातून नागरपूरकर कमावतात करोडो 

आता नागपूर आपले सांडपाणी महाराष्ट्र सरकारच्या वीज प्रकल्पाला विकते आणि एका वर्षात सुमारे 325 कोटी कमावते. कचर्‍यामधून संपत्ती निर्माण करणे हे नेतृत्व आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीवर अवलंबून आहे. आता आपण सांडपाण्यातून मूल्य निर्माण करू शकतो का याचा मी प्रयत्न करत आहे. असे नागपुरात सुरू केलेल्या 7 वर्ष जुन्या प्रकल्पाविषयी बोलताना गडकरी म्हणाले.

 इतर नाविन्यपूर्ण प्रकल्पांबद्दल भाष्य 

माझ्या खोलीच्या एका भिंतीवर शेणापासून बनवलेला पेंट लावला आहे. गोरक्षणाची गरज भासणार नाही, कारण जर आपण शेण आणि गोमूत्राची व्यावसायिक व्यवहार्यता निर्माण करू शकलो तर लोक आपल्या गायी विकणार नाहीत. गोमूत्रापासून फिनाईल बनवता येते, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

 (हेही वाचा:  दहावी-बारावीच्या ‘या’ विद्यार्थ्यांचे शुल्क होणार माफ! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.