पोलिसांच्या रखडलेल्या पदोन्नती मिळाला अखेर मुहूर्त, 175 अधिकाऱ्यांची बढती

115

कोरोना काळात बढतीपासून रखडलेल्या पोलीस निरिक्षक अधिका-यांच्या बढत्यांना आता अखेर मंजूरी मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बढत्या रखडल्या होत्या अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील 175 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली.

रिक्त पदे भरली जाणार 

राज्यातील 175 पोलीस निरिक्षकांनी गृहविभागाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्यातील पोलीस दलातील अनेक बदल्या व बढत्या रखडल्या होत्या. त्याला अखेर मुहूर्त मिळाला असून, 175 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. राज्य सरकारने मोठ्या संख्येने निरिक्षकांना एसीपीपदी बढती दिली आहे. 90, 91, 92 क 93 च्या बॅचमधील अधिका-यांना बढती दिल्याने राज्यात रिक्त असलेली अर्धेअधिक पदे आता भरली जाणार आहेत.

देण्यात आला नवा पदभार

मुंबई पोलीस दलातील दत्तात्रय शिंदे, श्रीनिवास पन्हाळे, सुर्यकांत बांगर, नितीन बोबडे, रवी सरदेसाई, धरणेंद्र कांबळे, सावळाराम आगवणे, श्रीराम कोरगावकर, दिवाकर शेळके, शशिकांत माने, जगदेव कालापाड, मृत्यूंजय हिरेमठ, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, संजय जगताप, हरीष गोस्वामी, दीपक निकम, किशोर गायके, सुहास हेमाडे, जयंत परदेशी, सुधीर कार्लेकर, दिनकर शिलवते, शरद ओहोळ, मुरलीधर कारकर, विठ्ठल शिंदे, नामदेव शिंदे, बाबासाहेब साळुंखे, शक्तीप्रसाद थोरात यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मुंबई पोलीस दलातच नवा पदभार देण्यात आला आहे.

 (हेही वाचा:  दहावी-बारावीच्या ‘या’ विद्यार्थ्यांचे शुल्क होणार माफ! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.