प्रशासन सतर्क! रामनगरी अयोध्या बॉम्बने उडवण्याची धमकी

99

रामनगरी म्हणून ओळख असणाऱ्या अयोध्येला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणेसह प्रशासकीय कर्मचारी सतर्क झाले आहेत. सुरक्षा यंत्रणेने सखोल तपास सुरू केला असून अयोध्येतील सर्व प्रमुख धार्मिक स्थळं, सर्व प्रवेशद्वारं, हॉटेल, धर्मशाळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अयोध्येत एका धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली असून अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी फोनकॉलच्या माध्यमातून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संपूर्ण अयोध्येत तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

‘या’ राज्यातून आला कॉल अन् उडाली धांदल

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने ईमर्जन्सी नंबर 112 वर फोन केला आणि अयोध्येत साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणणार असल्याची धमकी दिली. हा फोन आल्यानंतर या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली. यानंतर समोर असे समोर आले की, गुजरातमधील अहमदाबाद येथील एका अज्ञाताने हा कॉल करून अयोध्या बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. धमकीचा फोन आल्यानंतर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

(हेही वाचा – मोबाईलवर बोलणं आता पडणार महागात! वाचा, नवा केंद्रीय मोटार वाहन कायदा)

लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन

गुप्तचर संघटनांनी पोलिसांच्या सहकार्याने सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. गुप्तचर यंत्रणा गर्दीच्या ठिकाणी आणि हॉटेल आणि धर्मशाळांमध्ये संशयितांचा शोध घेत आहेत. मंदिरांमध्येही लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच अयोध्येतील बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी किंवा थांबण्याच्या ठिकाणी तपासणी केली जात आहे. एसएसपी शैलेश पांडे स्वतः लक्ष घालत होते. एसएसपींनी रामजन्मभूमी आणि इतर मंदिरांना भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. टीमसोबत दिवसभर अयोध्येतील रस्त्यांचा दौराही केला. दरम्यान, अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचवेळी बॉम्ब शोधक पथकासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र अद्याप अयोध्यानगरी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली, नसल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.