Famous Places in Pune : सुट्टीसाठी पुण्याला जाण्याचा विचार करत आहात ? पुण्यातील या 10 प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्या !

1170
Famous Places in Pune : सुट्टीसाठी पुण्याला जाण्याचा विचार करत आहात ? पुण्यातील या 10 प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्या !
Famous Places in Pune : सुट्टीसाठी पुण्याला जाण्याचा विचार करत आहात ? पुण्यातील या 10 प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्या !

सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळे आणि ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे म्हणजे पुणे. पुण्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे अनेक भारतीय, तसेच परदेशी पर्यटक पुण्याला भेट देण्याचा बेत आखतात. येथे अनेक ऐतिहासिक किल्ले, समृद्ध संस्कृती आणि नैसर्गिक ठिकाणे आहेत, ज्यांना पर्यटक नेहमी भेट देतात. प्रेक्षणीय स्थळांबरोबरच पुणे हे खासकरून लोकप्रिय मिसळ पाव आणि इतर अनेक पदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. ते सर्वोत्तम पिकनिक स्पॉटपैकी एक आहे. (Famous Places in Pune)

(हेही वाचा – Shri Siddhivinayak mandir : परिसराच्या विकासासाठी विशेष प्रकल्प हाती, रस्ता रुंदीकरणासह मंदिराचा कायापालट)

1. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

गणेश भक्तांनी गजबजलेले असे हे बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, एक प्रसिद्ध स्थान आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) स्थापना १८९३ मध्ये झाली आहे.

2. सारसबाग

हिरव्यागार आणि रंगीबिरंगी फुलांनी नटलेला स्वारगेटजवळील सारसबाग (Sarasbagh) प्रसिद्ध आहे. या बागेत एक लहान तलाव आहे, ज्यामध्ये गणपतीचे मंदिर आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी छोटी फुलराणी नावाची छोटी रेलगाडी देखील आहे.

3. लाल महाल

पुण्याच्या मध्यभागी असलेले लाल महाल (Laal Mahal) हे सर्वांत ऐतिहासिक ठिकाण आहे. लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालात गेले. येथेच शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. या सर्व ऐतिहासिक कामगिरीमुळे हे ठिकाण पुण्यातील सर्वांत प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक बनले आहे.

4. शनिवारवाडा

पेशवेकालीन ऐतिहासिक महत्त्व आणि समृद्ध संस्कृती असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे शनिवारवाडा (Shaniwar Wada). बाजीराव पेशव्यांनी सन १७३६ मध्ये बांधलेला शनिवारवाडा पेशव्यांचे निवासस्थान होते. हा वाडा पाहून पेशव्यांच्या ऐतिहासिक काळाची आठवण होईल. त्यामुळे पुण्यातील या प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्यायलाच हवी.

(हेही वाचा – Ban On SIMI : ‘सीमी’वरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली; भारतात इस्लामिक राजवट करण्याचे उद्दिष्ट)

5. शिवनेरी किल्ला

शिवाजी राजेंची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते, असा हा किल्ला पुण्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पुण्यापासून १०५ किमी अंतरावर जुन्नर येथे हा किल्ला आहे. दुरून शिवलिंगासारखा दिसणारा हा किल्ला सहज चढता येतो.

6. राजगड किल्ला

मुरुंबदेव म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला जवळपास २६ वर्षे शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होती. 1376 मीटर उंची असलेल्या या किल्ल्यावरून जेव्हा पर्यटक शिखरावर जातात, तेव्हा एक भव्य दृश्य दिसते.

7. आगाखान पॅलेस

इटालियन बनवाटीचा हा पॅलेस गांधी परिवारशी जोडलेला आहे. ब्रिटीश राजवटीत महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि भारत छोडो आंदोलनाला पाठिंबा देणारे महादेव भाई यांच्यासाठी या राजवाड्याचा तुरुंग म्हणून वापर केला जात होता. कस्तुरबा गांधी आणि महादेव भाई यांनी शेवटचा श्वास घेतला, ते ठिकाण हा राजवाडा होता असेही म्हणतात. त्यांचे पुतळेही या महालात आहेत

8. ओकायामा मैत्री बाग

बागेच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या पुलावरून पर्यटक रंगीबेरंगी मासे पाहू शकतात. या जपानी बागेला मराठीतील प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यात आले आहे. ओकायामा येथील ३०० वर्षे जुन्या कोराकू-एन गार्डनपासून ही बाग बनवण्याची प्रेरणा मिळाली होती; म्हणून तिला पुणे-ओकायामा फ्रेंडशिप गार्डन, असेही म्हणतात.

(हेही वाचा – Online Bus Booking : ऑनलाईन ॲपवर सांगितले जाते, तशा सुविधा खरेच मिळतात का ? बुकिंग करतांना खात्री करा !)

9. खडकवासला धरण

पुण्याची चौपाटी असे म्हटले जाणारे खडकवासला धरण हे पुण्याहून 15 किमीच्या अंतरावर स्थित आहे.

10. ओशो तीर्थपार्क

विविध लँडस्केप आणि वेगळ्या वातावरणासह या ठिकाणी जपानी संस्कृती आणि पर्यटक अनेकदा भेट देतात. हे ठिकाण अनेक पर्यटकांना ध्यान करण्यासाठी आकर्षित करते. जपानी पद्धतीने डिझाइन केलेले हे ठिकाण भारत – जपानच्या सांस्कृतिक आस्थेला धरून आहे. (Famous Places in Pune)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.