ICC Lifts Ban on Sri Lanka : आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावरील बंदी हटवली

श्रीलंकन क्रिकेट मंडळावरील बंदी ताबडतोब हटवण्यात आल्याचं आयसीसीने म्हटलं आहे.

205
ICC Lifts Ban on Sri Lanka : आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावरील बंदी हटवली
ICC Lifts Ban on Sri Lanka : आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावरील बंदी हटवली
ऋजुता लुकतुके

श्रीलंकन क्रिकेट मंडळाच्या कारभारात देशांतर्गत राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा ठपका ठेवत आयसीसीने नोव्हेंबर २०२३ मध्ये क्रिकेट बोर्डवर निलंबनाची कारवाई केली होती. इतकंच नाही तर तिथे प्रस्तावित असलेली आयसीसीची १९ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धाही तातडीने दक्षिण आफ्रिकेत हलवली. (ICC Lifts Ban on Sri Lanka)

त्यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या निर्णयाविरुद्ध आयसीसीकडेच अपील केलं होतं. पण, जानेवारी महिन्यात आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ॲलरडाईस यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि क्रीडामंत्री हरिन फर्नांडो यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आयसीसीने ही बंदी हटवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (ICC Lifts Ban on Sri Lanka)

श्रीलंकन बोर्डाबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याचं ॲलरडाईस यांनी म्‌हटलं आहे.

(हेही वाचा – CM Eknath shinde : ३ लाख १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार ८४ हजार रोजगार निर्माण होणार)

‘आयसीसीचा सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेली स्वायत्तता ही अट श्रीलंकन बोर्ड पूर्ण करत नव्हतं. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आम्ही या बोर्डावर निलंबनाची कारवाई केली. पण, त्यानंतरही आम्ही तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. आणि आता श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आयसीसी सदस्यत्वाच्या अटी पूर्ण करेल अशी खात्री पटल्यावर आम्ही बंदी हटवत आहोत,’ असं आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. (ICC Lifts Ban on Sri Lanka)

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आधीचे क्रीडामंत्री रणसिंघे यांनी क्रिकेट बोर्डाची कार्यकारिणी बरखास्त करून तिथे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली तात्पुरती समिती नेमण्याचा घाट घातला होता. हीच गोष्ट आयसीसीला रुचली नव्हती. देशाचं क्रिकेट मंडळ ही स्वायत्त संस्था असावी आणि लोकशाही पद्धतीने या संस्थेचा कारभार चालावा अशी आयसीसीची अट आहे. (ICC Lifts Ban on Sri Lanka)

श्रीलंकन बोर्डावरील निलंबनाच्या कारवाईनंतर मात्र तिथल्या सरकारने तातडीने काही पावलं उचलली. आणि सगळ्यात आधी रणसिंगे यांची उचलबांगडी केली. आणि त्यानंतर नवीन क्रीडामंत्री फर्नांडो यांच्याशी आयसीसीची चर्चा झाल्यानंतर क्रिकेट मंडळाचं निलंबनही मागे घेण्यात आलंय. (ICC Lifts Ban on Sri Lanka)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.