Shri Siddhivinayak mandir : परिसराच्या विकासासाठी विशेष प्रकल्प हाती, रस्ता रुंदीकरणासह मंदिराचा कायापालट

श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहे.

524
Shri Siddhivinayak mandir : परिसराच्या विकासासाठी विशेष प्रकल्प हाती, रस्ता रुंदीकरणासह मंदिराचा कायापालट
Shri Siddhivinayak mandir : परिसराच्या विकासासाठी विशेष प्रकल्प हाती, रस्ता रुंदीकरणासह मंदिराचा कायापालट

प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिरात (Shri Siddhivinayak mandir) मुंबईसह देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुलभरित्या दर्शन व्हावे, या हेतुने महानगरपालिकेने विशेष प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले असून या प्रकल्पात भाविकांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्ता, रस्ते रुंदीकरण, मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार, अत्याधुनिक स्वच्छतागृह आदी सुविधांचा समोवश असेल. श्री सिद्धिविनायक मंदीर (Shri Siddhivinayak mandir) न्यास यांच्यावतीने न्यासचे अध्यक्ष तथा आमदार सदा सरवणकर महानगरपालिकेचे परिमंडळ दोनचे उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या देखरेखीखाली हा विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे.

भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता

श्री सिद्धिविनायक मंदिर (Shri Siddhivinayak mandir) हे महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक धार्मिक स्थळ असल्याने याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध उपाययोजना या महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराभोवती (रावबहादूर सी. के. बोले मार्गावर) सद्यस्थितीत पूजा साहित्य विक्रेत्यांमुळे प्रवेशद्वाराजवळ दररोज गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी पूजा साहित्य विक्रेत्यांचे कै. काकासाहेब गाडगीळ मार्गावर स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच श्री सिद्धिविनायक मंदिरात (Shri Siddhivinayak mandir) दर्शनासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Raj Thackeray : रेल्वे भरतीसाठी मराठी तरुणांनी जागरूक राहावे, राज ठाकरे यांचे आवाहन)

दादर रेल्वे स्थानक ते सिध्दीविनायक मंदिर बस

यासमवेत मंदिराच्या दोन्ही मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारणे, अत्याधुनिक स्वच्छतागृह तयार करणे, दिव्यांग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शन रांगेत तात्पुरती बसण्याची व्यवस्था, ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे याकरिता छत, मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण, भाविकांसाठी वाहनतळ, मंदिराच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना, मंदिराजवळील नवीन मेट्रो स्थानकापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वाढीव सुविधा तयार करणे, दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) ते श्री सिद्धिविनायक मंदिर (Shri Siddhivinayak mandir) दरम्यान दर ५ मिनिटाला ‘बेस्ट’तर्फे मिनी बस चालविणे आदी कामांचा या विशेष प्रकल्पात समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.