Pushkar Jog : विरोधात महापालिकेत वातावरण तापले, कामगार संघटनांनी केली कारवाईची मागणी

दोन दिवसांपूर्वी सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या महिला कर्मचारी या चित्रपट अभिनेता पुष्कर जोग यांच्या घरी गेल्या असताना त्यांनी सर्वेक्षणातील प्रश्नावलीनुसार माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली.

1595
Pushkar Jog : विरोधात महापालिकेत वातावरण तापले, कामगार संघटनांनी केली कारवाईची मागणी
Pushkar Jog : विरोधात महापालिकेत वातावरण तापले, कामगार संघटनांनी केली कारवाईची मागणी

मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांशी उर्मटपणे वागणाऱ्या चित्रपट अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यांचा आता महापालिकेच्या कामगार संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. जर या महिला कर्मचाऱ्याच्या जागी पुरुष कर्मचारी असता तर त्यांच्या दोन लाथाच धातल्या असत्या असे विधान करत एकप्रकारे सरकारी कर्मचाऱ्याचा अपमान केला असल्याने या अभिनेत्यावर कडक कारवाई करण्यची मागणी आता कामगार संघटनांनी लावून धरली आहे. त्यामुळे या जोग विरोधात महापालिका तसेच सरकार काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसोबत महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी सर्वेक्षणाचे कामकाज कर्तव्यनिष्ठेने पार पाडत आहेत. या अनुषंगाने मुंबईत सर्व घरोघरी जाऊन मुलाखतीद्वारे सर्वेक्षणाचे महापालिकेचे काम करत आहे. हे सर्वेक्षणाचे काम सुरु असताना आता कर्मचाऱ्यांना वेगवेगळे अनुभव येत आहेत.

(हेही वाचा – Ban On SIMI : ‘सीमी’वरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली; भारतात इस्लामिक राजवट करण्याचे उद्दिष्ट)

दोन दिवसांपूर्वी सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या महिला कर्मचारी या चित्रपट अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यांच्या घरी गेल्या असताना त्यांनी सर्वेक्षणातील प्रश्नावलीनुसार माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली. यानुसार त्यांनी जात विचारली असता ते भडकले आणि त्यांनी आपल्या जागी जर पुरुष कर्मचारी असता तर त्यांच्यावर दोन लाथा घातल्या असत्या असे विधान त्या संबंधित महिलेला केले. महापालिकेच्या कर्मचाऱ्याशी शासकीय कर्तव्यात बाधा आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे दि म्युनिसिपल युनियन आणि बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियन आदींनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना पत्र लिहून याचा घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

पुष्कर जोग (Pushkar Jog) यांचे हे कृत्य हे सरकारी कर्मचाऱ्यांचे अपमान करणारे असून जोग यंनी केलेले विधान गंभीरपणे घेतले पाहिजे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य मागासवर्गीयस आयोगाच्या यांच्या मार्फत फौजदारी कारवाई करण्यात यावी,अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे, तर बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि सरचिटणीस यशवंत धुरी यांनी पुष्कर जोग (Pushkar Jog) यांच्यावर महापालिका प्रशासन आण् राज्य मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी अशाप्रकारचे वर्तन केल्यामुळे एकप्रकारे कर्मचार यांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला असून त्यांच्यावर महापालिका तसेच राज्य मागास आयोगाने कारवाई न केल्यास सर्व कर्मचारी तीव्र आंदोलन करतील असाही इशारा या कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.