Global Environmental photography award : ग्लोबल एन्व्हायरमेंटल फोटोग्राफी पुरस्कारावर तीन भारतीय छायाचित्रकारांनी कोरले नाव

115

द प्रिन्स अल्बर्ट ऑफ मोनॅको फाउंडेशन मध्ये तीन भारतीय फोटोग्राफर्स ने ग्लोबल एन्व्हायरमेंटल फोटोग्राफी पुरस्कारा वर आपले नाव कोरले.

या पुरस्कारासाठी छायाचित्रकार कल्लोल मुखर्जी यांचे हिमालयातील हिमवादळाचे छायाचित्र, प्रतिक चोरगे यांचे महाराष्ट्रातील २०,००० लिटर पाण्याच्या टँकरभोवती गर्दी करतानाचे छायाचित्र आणि सौम्या रंजन भट्टाचार्य यांचे वाघ मगरीची शिकार करत आहे, अशा या तीन छायाचित्रकारांची छायाचित्रे निवडली आहेत.

हे प्रदर्शन मोनॅकोमध्ये प्रोमेनेड डु लव्होटो येथे प्रदर्शित केले होते. प्रभावी फोटोग्राफीतून पर्यावरण जागरूकतेला प्रोत्साहन देणे ह्या या पुरस्कारमागील मूळ उद्दिष्ट आहे. ग्लोबल एन्व्हायरमेंटल फोटोग्राफी पुरस्काराच्या विजेतांना रक्कम ७५०० युरो रकमेचे बक्षीस व इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रिसर्च बेसला भेट देण्यासाठी इक्वाडोरची ट्रिप देखील मिळणार आहे. फोटोग्राफी हे धोक्यात आलेल्या वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संवर्धनाला सहाय्या ठरण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे, असे ज्युरीचे अध्यक्ष सर्जिओ पिटामिट्झ म्हणाले.

(हेही वाचा Maharashtra Government : सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वयासाठी 12 सदस्यीय समिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.