chatgpt शी स्पर्धा करणार एलॉन मस्कने लॉन्च केला ‘हा’ नवा स्टार्टअप

147

टेस्ला आणि ट्वीटरनंतर एलॉन मस्क यांनी आता आर्टिफिशियल तंत्रज्ञान (AI) क्षेत्रात ‘xAI’ या नवीन स्टार्टअपची सुरुवात केली आहे. ट्वीटरवरुन या संदर्भात मस्क यांनी माहिती दिली आहे. ‘xAI’ हे स्टार्टअप AI ला अधिकाधिक वास्तवाशी जोडणारे असेल, असेही मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये नमुद केले आहे.

‘ब्रम्हांडाच्या प्रकृतीबाबत अधिक जाणून घेणे’ हा या नव्या स्टार्टअप मागचा हेतू असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे यात ओपन ए आय, गुगल डिप माईंड, टेस्ला या कंपन्यांमधील काही तज्ञही या कंपनीचा हिस्सा असल्याचे समोर येत आहे. एलॉन मस्क या कंपनीचे डायरेक्टर असतील तर जेरेड बर्चल या फर्मच्या सेक्रेटरीपदी असतील.

एलॉन मस्क हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेचा कायम इशारा देत आले आहेत. ‘मानवी अस्तित्वासाठी मोठे आव्हान’ या शब्दांत मस्क यांनी AI ची समीक्षा केली होती. आता त्याच्या विरुद्ध म्हणजेच AI शी जोडले जाण्याच्या एलॉन मस्क यांच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(हेही वाचा Maharashtra Government : सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वयासाठी 12 सदस्यीय समिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.