पंजाब केसरी महान स्वातंत्र्यसैनिक Lala Lajpat Rai यांनी केली होती ’या’ बॅंकेची स्थापना

204
पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध असलेले महान स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच लाला लजपत राय. लाल-बाल-पाल हे नाव आपण इतिहासात वाचलं आहे. शालेय पाठ्यपुस्तकातील त्यांचा इतिहास अजरामर झाला आहे. त्यातील लाल म्हणजेच लाला लजपत राय. लाला लजपत राय (Lala Lajpat Rai) यांचा जन्म पंजाबमधील मोगा जिल्ह्यात २८ जानेवारी १८६५ रोजी अग्रवाल जैन कुटुंबात झाला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाचे प्रमुख नेते होते.
लाल लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रिमूर्तींना लाल-बाल-पाल म्हणून ओळखले जाते. या तिन्ही नेत्यांनी प्रथम भारतात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. त्यांनी देश एकसंध केला. लाला यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्याच्या मदतीने पंजाबमध्ये आर्य समाजाची पाळेमुळे रोवली. लालाजींनी दुष्काळातही अनेक ठिकाणी छावण्या उभारून लोकांची सेवा केली.
लालाजींकडून (Lala Lajpat Rai) प्रेरण अघेऊन अनेक क्रांतिकारक तयार झाले. लालाजींवर झालेल्या प्राणघातक लाठीचार्जचा प्रतिशोध घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सज्ज झाले. १७ डिसेंबर १९२८ रोजी ब्रिटीश पोलीस अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून मारले. या प्रकरणी राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांना फाशीची शिक्षा झाली.
३० ऑक्टोबर १९२८ रोजी लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात त्यांनी निदर्शने केली. त्या दरम्यान लाठीचार्जमध्ये ते गंभीर जखमी झाले. १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर २० वर्षांतच ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळला. विशेष म्हणजे लालाजींनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.