Ind vs Eng 1st Test : शुभमन गिलच्या अपयशावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड काय म्हणाले?

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हैद्राबाद कसोटीत २३ धावांवर बाद झाला.

178
Ind vs Eng 1st Test : शुभमन गिलच्या अपयशावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड काय म्हणाले?
Ind vs Eng 1st Test : शुभमन गिलच्या अपयशावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ प्रशासनाने यशस्वी जयसवालला सलामीला खेळवलं. आणि रोहित, यशस्वी सलामीला खेळल्यावर शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला. खरंतर शुभमन तिसऱ्या स्थानावर खेळायला उत्सुक होता. पण, प्रत्यक्ष कसोटीत शुभमन इंग्लिश फिरकी गोलंदाजांसमोर काहीसा चाचपडताना दिसला. त्याने २३ धावा केल्या खऱ्या. पण, यात त्याचा पवित्रा बचावात्मक होता. (Ind vs Eng 1st Test)

शिवाय नवख्या टॉम हार्टलेच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून तो बाद झाला. मागच्या काही सामन्यांमध्ये शुभमन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलाय. पण, संघ प्रशासनाला सध्या तरी त्याची काळजी वाटत नाहीए. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा त्याला पाठिंबाच आहे. ‘शुभमनने फलंदाजीचा फार विचार करणं सोडलं की, सगळं ठिक होईल. आपला नैसर्गिक खेळ करण्यावर त्याने लक्ष केंद्रीत करावं, एवढंच माझं त्याला सांगणं असेल,’ असं राहुल द्रविड शुभमन विषयी बोलताना म्हणाले. शुभमनचा आणखी एक संघ सहकारी के एल राहुलनेही शुभमनची पाठराखण केली आहे. (Ind vs Eng 1st Test)

(हेही वाचा – Oxygen Cylinder Plant : महापालिका बनली आत्मनिर्भर)

संघ प्रशासन शुभमनच्या बाजूने

‘खेळाडू म्हणून शुभमनचा दर्जा वरचा आहे. तो फिरकीला खूप चांगलं खेळतो. आताही फक्त त्याचा आत्मविश्वास परतण्याची देरी. तो मोठी खेळी करेलच. कुठलंही दडपण न घेता फलंदाजी करणं महत्त्वाचं. आणि ते शुभमन शिकेलच,’ असं राहुल जिओ सिनेमा या प्रसारण वाहिनीशी बोलताना म्हणाला. (Ind vs Eng 1st Test)

हार्टलेला खेळताना शुभमनची फटक्याची निवड चुकली अशी टीका समालोचन कक्षात सुनील गावसकर यांनी केली होती. तर माजी इंग्लिश खेळाडू केविन पीटरसन यांनी त्याच्यावर एकेरी, दुहेरी धावा न घेण्याचा आरोप केला होता. पण, सध्या संघ प्रशासन शुभमनच्या बाजूने उभं आहे. आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याची संघातील जागाही पक्की आहे. (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.