Oxygen Cylinder Plant : महापालिका बनली आत्मनिर्भर

मुंबईमध्ये कोरेानाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवल्याने महापालिकेच्यावतीने उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याबरोबरच अन्य रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरची गरज लक्षात घेता महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट अर्थात ऑक्सिजन पुनर्भरण केंद्र उभारले आहे.

748
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईमध्ये कोरेानाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवल्याने महापालिकेच्यावतीने उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याबरोबरच अन्य रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरची गरज लक्षात घेता महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट अर्थात ऑक्सिजन पुनर्भरण केंद्र उभारले आहे. ज्यातून दिवसाला १५०० सिलेंडर भरले जात असून आवश्यकतेनुसार महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जातो. त्यामुळे कोविड काळात खासगी कंपनीकडून ऑक्सिजन बाटलांचा पुरवठा करून घेणाऱ्या महापालिकेला आता आपल्याच प्लांटमधून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महापालिका ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबतील आत्मनिर्भर बनल्याचे दिसून येत आहे. (Oxygen Cylinder Plant)

वायुरुप ऑक्सिजन बॉटलिंग प्लांटची निर्मिती

महापालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये ड्युरा आणि जंबो सिलेंडरचे पुनर्भरण महापालिकेच्या अधिकृत पुरवठादार यांच्या रबाळे अणि तुर्भे येथील प्लांटमधून करण्यात येत आहे. महापालिकेचे अधिकृत पुरवठादार हे इतर महापालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये यांनाही ऑक्सिजन पुरवठा करत असल्यामुळे अत्यंत निकडीच्यावेळी महापालिकेला यांच्यावरती अवलंबून राहावे लागत होते. त्यानुसार महापालिकेने कोविड रुग्णांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य व्हावे तसेच भविष्यात महापालिकेतील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होण्याकरता माहुल येथील जागेमध्ये बीपीसीएलजवळ स्वत:चे जंबो सिलेंडर भरण्यासाठी वायुरुप ऑक्सिजन बॉटलिंग प्लांटची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. (Oxygen Cylinder Plant)

१५०० जंबो ऑक्सिजन सिलेंडरची क्षमता

या बॉटलिंग प्लांटमध्ये बीपीसीएल कंपनी पाईपद्वारे ऑक्सिजन वायू प्राप्त करून देत आहे. याठिकाणी बीपीसीएल द्वारे एक आणि महापालिकेच्यावतीने दोन अशाप्रकारे तीन काँप्रेसर बसवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये दिवसाला १० ते १५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होणे अपेक्षित होते. या ऑक्सिजन वायूचा वापर करून आणीबाणीच्या काळात दिवसाला ७.१ क्युबिक मीटर क्षमतेचे १५०० जंबो ऑक्सिजन सिलेंडर भरण्यात येत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Oxygen Cylinder Plant)

(हेही वाचा – Mumbai Coastal Road : मरीन ड्राइव्ह-वरळीचा मार्ग ९ फेब्रुवारीपासून होणार खुला)

याचा विस्तार उर्वरीत सर्व महापालिका रुग्णालयांपर्यंत

मुंबई महापालिकेच्यावतीने हे पहिलेच ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट असून या पुनर्भरण केलेले ऑक्सिजन सिलेंडर महापालिकेच्या थोड्या रुग्णालयांना पुरवण्यात येत असून याचा विस्तार उर्वरीत सर्व महापालिका रुग्णालयांपर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे माहुल जवळील या महापालिका ऑक्सिजन पुनर्भरण केंद्राची पुढील देखभाल व संलग्न कामे करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मॅक एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात येत आहे. (Oxygen Cylinder Plant)

अग्निसुरक्षा प्रणाली बसवण्यात येणार

यामध्ये महापालिकेने बांधलेल्या ऑक्सिजन पुनर्भरण केंद्राची दोन वर्षांची देखभाल आणि बीपीसीएलने बांधलेल्या एका काँप्रेसरची दोन वर्षांकरता देखभाल, तसेच संबंधित कामे, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पुरवठा, अग्निसुरक्षा प्रणालीचा पुरवठा, या प्रणालीच्या एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर ३ वर्षांची पुढील देखभाल अशाप्रकारच्या कामांची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या शिफारशीनुसार अग्निसुरक्षा प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यामुळे याठिकाणी ही प्रणाली बसवणे आणि त्यांची पुढील देखभाल करणे आदींची जबाबदारी राहिल असे यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Oxygen Cylinder Plant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.