गुजरातमधील निसर्ग कवी Rajendra Shah

119
राजेंद्र केशवलाल शाह (Rajendra Shah) हे गुजराती भाषेतील कवी होते. त्यांचा जन्म १९१३ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील कपडवंज येथे झाला. त्यांनी मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी ते बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात दाखल झाले आणि त्यांनी तत्त्वज्ञानाची पदवी घेतली.
शाह (Rajendra Shah) यांनी आपल्या कारकिर्दीत २० पेक्षा अधिक काव्यसंग्रह आणि गीतसंग्रह प्रकाशित केले. त्यांच्या कविता प्रामुख्याने निसर्ग कविता म्हणता येतील. नैसर्गिक सौंदर्यावर त्यांनी पुष्कळ लेखन केले आहे. त्याचबरोबर स्थानिक लोक आणि मच्छीमार समुदायांचे दैनंदिन जीवनदेखील त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले आहे.
त्यांची पहिली कविता १९३३ मध्ये विल्सन कॉलेजच्या कॉलेज मॅगझिन विल्सोनियनमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या कवितांवर रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव होता. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला. १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत त्यांना अटक झाली. १९३१ मध्ये त्यांनी मंजुळा अग्रवाल यांच्याशी विवाह केला. साहित्यरचनेसह उदरनिर्वाहासाठी ते अहमदाबादमधील शाळेत शिकवत होते.
शाह (Rajendra Shah) यांच्या साहित्य-योगदानासाठी त्यांनी १९४७ मध्ये त्यांना कुमार चंद्रक, १९५६ मध्ये रणजीतराम सुवर्ण चंद्रक, शांत कोलाहल या पुस्तकासाठी त्यांना १९६३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९८० मध्ये  गुजराती साहित्य परिषदेचा अरबिंदो सुवर्ण चंद्रक, १९९२ मध्ये साहित्य गौरव पुरस्कार आणि नरसिंह मेहता पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. २००१ मध्ये त्यांचा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.