French President Visit India : राफेल इंजिनची देखभाल-दुरुस्ती भारतातच होईल, मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण क्षेत्रातील करार

पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण, औद्योगिक क्षेत्रात भागीदारी वाढवण्यास सहमती दर्शवली.

117
French President Emmanuel Macron Visit India : राफेल इंजिनची देखभाल-दुरुस्ती भारतातच होईल, मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण क्षेत्रातील करार
French President Emmanuel Macron Visit India : राफेल इंजिनची देखभाल-दुरुस्ती भारतातच होईल, मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण क्षेत्रातील करार

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) (French President Visit India) २५-२६ जानेवारीला २ दिवसांच्या राज्य दौऱ्याकरिता भारतात आले होते. ते थेट जयपूर विमानतळावर उतरले. तेथे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे स्वागत केले. मॅक्रॉन यांनी जयपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत रोड शो केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवरही बैठक झाली.

या काळात भारत आणि फ्रान्समध्ये अनेक करार झाले. पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि मॅक्रॉन यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण, औद्योगिक क्षेत्रात भागीदारी वाढवण्यास सहमती दर्शवली. त्यासाठी रोडमॅपही तयार करण्यात आला होता. स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्या आणि त्यांचे घटक भारतात तयार करण्याच्या कराराचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. या प्रकल्पाच्या प्रगतीचीही त्यांनी पाहणी केली तसेच सेफरान कंपनीने भारतात राफेल लढाऊ जेट इंजिनची देखभाल, दुरुस्ती आणि ऑपरेशनसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी केलेल्या कराराचे यावेळी स्वागत करण्यात आले याशिवाय IMRH हेलिकॉप्टर इंजिन तयार करण्यासाठी सेफरान कंपनी भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)सोबत संयुक्त उपक्रम राबवणार आहे.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : मराठा समाज बांधवांनी आरक्षणाची दुसरी बाजू समजून घ्यावी)

भारतीय सैन्याला स्वतंत्र करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
फ्रान्सचे आयुध महासंचालक (DCA) आणि भारताची संरक्षण संशोधन विकास संस्था (DRDO)यांच्यातही चर्चा सुरू आहे. या दोन्ही संस्था लवकरच सामंजस्य करार करणार आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण क्षेत्रातील करार आत्मनिर्भर भारत मिशनसाठी महत्त्वाचे मानले जातात. भारतीय सैन्याला स्वतंत्र करण्यासाठी हेदेखील महत्त्वाचे पाऊल आहे तसेच २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय विज्ञान, तंत्रज्ञान आणि डिजिटल विकासातील भागीदारीवरही यावेळी चर्चा झाली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.