BMC Schools : महापालिका शाळांमधील २२२३ विद्यार्थ्यांनी दिली ऑलिंपियाड परीक्षा

इयत्ता ३ री ते ८ वीचे एकूण २२२३ विद्यार्थी हे इंग्रजी, गणित व विज्ञान प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षेला बसवले आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने फायरफिश नेटवर्कस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे.

293
BMC Schools : महापालिका शाळांमधील २२२३ विद्यार्थ्यांनी दिली ऑलिंपियाड परीक्षा
BMC Schools : महापालिका शाळांमधील २२२३ विद्यार्थ्यांनी दिली ऑलिंपियाड परीक्षा

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी प्रायमरी ऑलिंपियाडसाठी केब्रीज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार परिक्षेसाठी इयत्ता ३ री ते ८ वीचे एकूण २२२३ विद्यार्थी बसले. यासर्व परिक्षेसाठी महापालिकेच्यावतीने २२ लाख २३ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. (BMC Schools)

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत महापालिकेच्या शाळांमध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी प्रायमरी ऑलिंपियाडसाठी केंब्रीज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांनुसार परीक्षेची तयारी करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इयत्ता ३ री ते ८ वीचे एकूण २२२३ विद्यार्थी हे इंग्रजी, गणित व विज्ञान प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षेला बसवले आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने फायरफिश नेटवर्कस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. (BMC Schools)

(हेही वाचा – Maratha Reservation : आता आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा; राज ठाकरे यांच्या जरांगेना सूचना)

या कंपनीला परीक्षा शुल्क म्हणून प्रति विद्यार्थी एक हजार रुपये एवढे मोजले असून २२२३ विद्यार्थ्यांसाठी एकूण २२ लाख २३ हजार रुपये खर्च केले गेले. ही परीक्षा केंब्रीज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC Schools)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.