Travel Company : खाजगी ट्रॅव्हल कंपनीकडून पुण्यातील ज्येष्ठ पत्रकाराची फसवणूक; ऑनलाईन तक्रार दाखल

इंटरसिटी ट्रॅव्हल्स कंपनीने आरामदायी प्रवास आणि बसमध्ये सर्व सोयीच्या नावाखाली चक्क एका भंगार बसमधून पुणे ते पणजी प्रवास घडवून प्रवाशांची हाडे खिळखिळी केली अशी तक्रार या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

209
Travel Company : खाजगी ट्रॅव्हल कंपनीकडून पुण्यातील ज्येष्ठ पत्रकाराची फसवणूक; ऑनलाईन तक्रार दाखल
Travel Company : खाजगी ट्रॅव्हल कंपनीकडून पुण्यातील ज्येष्ठ पत्रकाराची फसवणूक; ऑनलाईन तक्रार दाखल

एका खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून (Travel Company) प्रवाशांची घोर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात नुकताच समोर आला आहे. इंटरसिटी ट्रॅव्हल्स कंपनीने आरामदायी प्रवास आणि बसमध्ये सर्व सोयीच्या नावाखाली चक्क एका भंगार बसमधून पुणे ते पणजी प्रवास घडवून प्रवाशांची हाडे खिळखिळी केली अशी तक्रार या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ट्रॅव्हल्स कंपनीकडून फसवणूक करण्यात आल्याची ऑनलाईन तक्रार पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांनी राज्य परिवहन विभागाकडे केली आहे.

खाजगी ट्रॅव्हल्स (Travel Company) मालकांकडून मनमानी आणि प्रवाशांची आर्थिक लूट राज्यभरात सुरू आहे, प्रवाशांकडून याबाबत तक्रार करून देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. संबंधित सरकारी यंत्रणाचे खाजगी ट्रॅव्हल कंपन्या सोबत आर्थिक नाते असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे, त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल  मालकांकडून सर्व नियम पायदळी तुडवून सामान्य प्रवाशांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या फसवणूक आणि लुटीचा अनुभव खुद्द पुण्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराला आला आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य असणारे पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांना पुण्याहून पणजी येथे बैठकीसाठी तातडीने निघायचे होते. देशमुख यांनी इंटरसिटी ट्रॅव्हल या खाजगी कंपनीचे (Travel Company) बसचे तिकीट ऑनलाईन बुक केले होते, तिकीट बुक करताना त्यांना ही बस २+१ (३०) वातानुकूलित, स्लीपर सोबत वॉशरुम भारतबेंज, फुल्ल एअर सस्पेंसन्स असे सांगण्यात आले होते, तसेच देशमुख यांच्याकडून पुणे ते पणजी दरम्यानचे प्रवास भाडे अठराशे घेण्यात आले होते. मात्र देशमुख यांना पुणे ते पणजी असा प्रवास करताना इंटरसिटी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करताना जो अनुभव आला त्यांनी तो अनुभव फेसबुकवर व्यक्त केला आहे. (Travel Company)

(हेही वाचा – Credit Cards in India : भारतात क्रेडिट कार्डांची संख्या लवकरच १० कोटींच्या वर  जाणार)

देशमुख यांच्या म्हणण्यानुसार तिकीट बुक करताना ज्या बसमध्ये काय सवलती असतील याबाबत सांगण्यात आलेल्या सवलतींपैकी केवळ वातानुकूलित आणि आसन व्यवस्था होती, बसला अजिबात सस्पेन्सन नव्हते, तर वॉशरूम देखील नव्हते, बस देखली पूर्णपणे भंगारात काढावी अशी तीची अवस्था होती. पुणे ते पणजी प्रवासादरम्यान संपूर्ण शरीराचे हाडे खिळखिळी झाली असे देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया हिंदुस्थान पोस्टशी बोलताना दिली. “इंटरसिटी ट्रॅव्हल कंपनीकडून माझी आणि सह प्रवाशांची फसवणूक करण्यात आलेली असून, या प्रकरणी मी शनिवारी राज्य परिवहन विभागाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे, तसेच ग्राहकमंचाकडे आणि स्वार गेट पोलीस ठाण्यात देखील ट्रॅव्हल्स कंपनी विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे देशमुख यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. (Travel Company)

बसची माहिती…

हिंदुस्थान पोस्ट कडून या बसची माहिती काढली असता भारतबेंज कंपनीची ही बस क्रमांक एम. एच. ०१-डी. आर ०३१३ असा असून मोना हर्ष कोटक नावाने बसची परिवहन विभागात नोंदणी आहे. १९ फेब्रुवारी२०१९मध्ये उभा बसची नोंदणी मुंबईतील ताडदेव परिवहन कार्यालयात करण्यात आलेली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.