मुंबईहून विमान प्रवाशांचा भिजत प्रवास

78

मुंबईहून मध्य प्रदेशच्या जबलपूरला जाणा-या स्पाईसजेटच्या विमानाच्या आत अचानक पाणी टपकायला लागल्याचे वृत्त समोर आले आहे. पाणी गळायला लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. विमानात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. विमानातील अनेक सीटवर पाणी टपकत होते, असे प्रवाशांनी सांगितले.

याबाबत त्यांनी एअर होस्टेसकडेही तक्रार केली. मात्र तिने लक्ष दिले नाही. एअर होस्टेसने उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या दरम्यान, विमानातील एका प्रवाशाने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

( हेही वाचा: पुणे- मुंबई रेल्वेमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद )

शाॅर्ट सर्किटचीही भीती 

मुंबईहून जबलपूरला जाणारे स्पाईसजेट विमान क्रमांक 3003 बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास जबलपूरला पोहोचले, त्यात बरेच प्रवासी होते. कमल ग्रोव्हर नावाचे व्यापारीही याच विमानातून प्रवास करत होते. त्यांनी एका सोशल मिडिया पोस्टद्वारे या घटनेबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. लाईट कनेक्शनजवळून पाणी गळत होते, त्यामुळे शाॅर्ट सर्किटची भीतीही प्रवाशांना सतावत होती. अखेर विमान मुंबईहून जबलपूरला आल्यानंतरच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.