जगात अशा काही जागा आहेत, ज्यावरुन विमान उड्डाण करु शकत नाही! जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये

61

नेपाळमधील दुर्दैवी अपघातानंतर विमान प्रवासाबाबतच्या अनेक गोष्टी चर्चेत आल्या. अपघात टाळण्यासाठी जगात अशा काही जागा आहेत, जिथे नो फ्लाई झोन घोषित करण्यात आले आहे. खरं तर नो फ्लाई झोन कायमचे आणि तात्पुरते देखील असते. बर्‍याचदा महत्वाच्या कारणासाठी सरकार विशिष्ट ठिकाणाला नो फ्लाई झोन म्हणून घोषित करतात. त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती असलेल्या ठिकाणाला देखील नो फ्लाई झोन म्हणून घोषित केलं जातं. महत्वाचं म्हणजे जगातील अनेक स्थळांना कायचे नो फ्लाई झोन घोषित करण्यात आले आहे.

युनायटेड किंगडममधील बकिंघम पॅलेसला नो फ्लाई झोन घोषित करण्यात आलं आहे. ब्रिटनच्या शाही घराण्याचं हे कार्यालय असून ब्रिटनच्या राणीचा निवास देखील इथेच असतो. या स्थळाला नो फ्लाई झोन घोषित करण्यात आलं आहे कारण पॅलेस आणि शाही घराण्याची सुरक्षा ब्रिटनसाठी अतिशय महत्वाची आहे.

मक्का हे इस्लामचे महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. मक्का व विशेषतः काबा हे नो फ्लाई झोन आहे. इथून विमानाला उड्डाण करायला अनुमती नाही. दक्षिण अमेरिकेतील पेरु या देशातील माची पिच्चू हे ठिकाण जगातील सात आश्चर्यांपैकी एक असून इथे जगभरातून प्रवासी येत असतात. या स्थळावरुन विमान नेण्यास मनाई आहे. हे स्थळ समुद्री तटापासून २४३० मीटर उंचावर असून उरुबाम्बा खोर्‍यात वसलेलं आहे. इथे दुर्मिळ वन्य जीवनाचे दर्शन देखील घ्यायला मिळते.

( हेही वाचा: मोठी बातमी: राज्यातील कत्तलखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी )

१६००० फूट उंच असलेल्या तिबेटमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानाला उड्डाण करण्यास मनाई आहे. हे स्थळ जगातील उंच स्थळांपैकी एक असून इथे अनेक प्रवासी येत असतात. तसेच कॅलिफोर्नियातील डिज्ने पार्कदेखील नो फ्लाई झोन आहे. डिज्ने पार्क म्हणजे जगभरातील सर्वच लोकांच्या आकर्षणाचं केंद्र. ९/११ च्या हल्ल्यानंतर या ठिकाणच्या सुरक्षेसाठी इथून विमान उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भारताच्या ताजमहालच्या सुरक्षेसाठी २००६ मध्ये या क्षेत्राला नो फ्लाई झोन म्हणून घोषित केले. हे स्थळ खूप महत्वाचं आहे. १९८३ मध्ये यूनेस्कोने ताजमहालला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. त्यामुळे इथे येणार्‍या पर्यटकांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. तर हे जगातील काही महत्वाची ठिकाणे होती, ज्यांना नो फ्लाई झोन घोषित करण्यात आले आहे. विमान अपघात होऊ नये व हवाई अतिरेकी हल्ला होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.