Veer Savarkar : वीर सावरकर आणि महामानव भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याचे सावरकर स्मारकात अनावरण 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Veer Savarkar) आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुक्ती शताब्दी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात 'मैत्र जीवांचे' या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ८ मार्च रोजी करण्यात आले.

164
ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि महामानव भागोजीशेठ कीर हे जीवलग मित्र होते. भागोजीशेठ कीर यांना जाऊन ८० वर्षे पूर्ण झाली. त्यांनी वीर सावरकर यांच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात कार्य केले होते. त्यांचे कार्य जगासमोर यावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुक्ती शताब्दी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘मैत्र जीवांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ८ मार्च रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अंतर्गत वीर सावरकर आणि महामानव भागोजी कीर या दोन महापुरुषांच्या अर्ध-पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

असा झाला सोहळा… 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Veer Savarkar) आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्राभिमानी नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रा. प्रदीप ढवळ, स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, महामानव भागोजीशेठ कीर यांचे वंशज अंकुर कीर, श्री काडसिद्धेश्वर महाराज यांचे शिष्य, आध्यात्मिक गुरु अविनाश महाराज हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने निर्मित वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी लिहिलेल्या ‘अनादी मी, अनंत मी…’ या गाण्याची चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर भागोजीशेठ कीर यांच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी मान्यवरांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थित वीर सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात श्रद्धाताई पाटील यांनी भागोजीशेठ कीर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.