PM Narendra Modi : नवमतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे पंतप्रधान मोदींनी केले आवाहन

पंतप्रधान म्हणाले, भविष्यात, राष्ट्रीय सृजक पुरस्कार आशय निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत बनतील आणि त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करतील. पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि अतिशय कमी वेळेतील स्पर्धकांच्या सक्रिय सहभागाचीही प्रशंसा केली.

69
PM Narendra Modi : नवमतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे पंतप्रधान मोदींनी केले आवाहन

निवडणुकीत विजयी आणि पराभूत घोषित करण्यासाठी मतदान केले जात नाही, तर इतक्या विशाल देशाचे भविष्य घडवणाऱ्या निर्णय प्रक्रियेचा एक भाग बनण्यासाठी मतदान केले जाते. ही भावना जागृत करण्यासाठी देशातील तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. जरी अनेक राष्ट्रे वेगवेगळ्या मार्गांनी समृद्ध झाली, तरीही त्यांनी लोकशाहीचा पर्याय निवडला असेही त्यांनी नमूद केले. भारताने शंभर टक्के लोकशाहीचा अभिमान बाळगून विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प केला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

(हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांची ‘दादा’गिरी नक्की कुणावर?)

पहिला राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे पहिला राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान केला. त्यांनी पुरस्कार विजेत्यांशी संक्षिप्त संवादही साधला. यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. राष्ट्रीय सृजक पुरस्कार हा कथाकथन, सामाजिक बदलाचे समर्थन, पर्यावरणीय स्थैर्य , शिक्षण आणि गेमिंग यासह सर्व क्षेत्रांतील उत्कृष्टता आणि प्रभाव यांचा गौरव करण्याचा प्रयत्न आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी एक मंच म्हणून या पुरस्काराची कल्पना पुढे आली.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) या कार्यक्रमासाठी निवडलेल्या भारत मंडपमच्या ठिकाणाची दखल घेतली आणि सांगितले की, राष्ट्रीय सृजक आज त्याच ठिकाणी एकत्र आले आहेत जिथे जागतिक नेत्यांनी जी २० शिखर परिषदेत भविष्याला दिशा दिली होती.

(हेही वाचा – GST Receipt Fraud : बनावट जीएसटी पावत्यांद्वारे २५.७३ कोटींची फसवणूक प्रकरणी एकाला अटक)

राष्ट्रीय सृजक पुरस्कार आगामी काळात मोठा प्रभाव निर्माण करतील :

कालौघात झालेले बदल आणि नव्या युगाच्या उदयाच्या बरोबरीने चालणे ही देशाची जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) अधोरेखित केले. ते म्हणाले की, देश आज प्रथमच राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान करून ती जबाबदारी पार पाडत आहे. “राष्ट्रीय सृजक पुरस्कार नवीन युगाला त्याची सुरुवात होण्याआधीच ओळख देत आहेत”, असे नमूद करतानाच पंतप्रधानांनी भविष्याचे आधीच विश्लेषण करण्याचे सामर्थ्य अधोरेखित केले. नवीन युगाला ऊर्जा देऊन आणि तरुणांच्या सर्जनशीलतेचा आणि दैनंदिन जीवनातील बाबींप्रति त्यांच्या संवेदनशीलतेचा आदर करून राष्ट्रीय सृजक पुरस्कार आगामी काळात मोठा प्रभाव निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२ लाखांहून अधिक सर्जनशील :

पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले, भविष्यात, राष्ट्रीय सृजक पुरस्कार आशय निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत बनतील आणि त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करतील. पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि अतिशय कमी वेळेतील स्पर्धकांच्या सक्रिय सहभागाचीही प्रशंसा केली. “या कार्यक्रमासाठी २ लाखांहून अधिक सर्जनशील मनांचे एकत्रित येणे देशाची स्वतःची ओळख निर्माण करत आहे”,यावर त्यांनी भर दिला.

(हेही वाचा – Rohit Sharma : धोनीपेक्षा रोहित शर्मा यशस्वी कर्णधार ? काय सांगते आकडेवारी ?)

सर्जनशीलतेचे निर्माते म्हणून भगवान शिव यांचा गौरव केला जातो :

महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगी प्रथमच राष्ट्रीय सृजक पुरस्कार देण्यात येत असल्याचे नमूद करून पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, भाषा, कला आणि सर्जनशीलतेचे निर्माते म्हणून भगवान शिव यांचा गौरव केला जातो. “आपला शिव नटराज आहे, त्याच्या डमरूतून महेश्वर सूत्र ऐकू येते , त्याचे तांडव लय आणि निर्मितीचा पाया रचते,” असे सांगत पंतप्रधानांनी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.